बॉलीवूडचा अभिनेता खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्याआधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची टक्कर प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या 'लाल सिंग चड्डा' चित्रपटासोबत होणार आहे. रक्षाबंधन हा अक्षय कुमारचा या वर्षातील तिसरा चित्रपट आहे. याआधी 'बच्चन पांडे' आणि 'सम्राट पृथ्वीराज' रिलीज झाले असून, या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवलेली नाही. अक्षयला आता त्याच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहे.
11 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपट OTT वर आणणार असल्याची माहिती अक्षयने दिली आहे. म्हणजेच तुम्हाला घरी बसून हा चित्रपट पाहता येईल. या बातमीनंतर अक्षयच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता अजूनच वाढली आहे.
कुठे रिलीज होणार चित्रपट ?
अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा चित्रपट Zee5 प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. OTT रिलीजची तारीख अद्याप उघड झालेली नाही. सहसा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 8 आठवड्यांनंतर OTT वर आणला जातो. जर असे झाले तर, सप्टेंबरच्या अखेरीस हा चित्रपट Zee5 वर येऊ शकतो.
अक्षय कुमार व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकर, नीरज सूद, सीमा पाहवा, सादिया खतीब, अभिलाष थापलियाल, दीपिका खन्ना, स्मृती श्रीकांत आणि सहमीन कौर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एक कौटुंबिक नाटक आहे, ज्यामध्ये भाऊ-बहिणींच्या नात्यातील प्रेम दाखवण्यात आले आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.