Raksha Bandhan BO Collection : रक्षाबंधन चित्रपटाने आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केली

Raksha Bandhan BO Collection : रक्षाबंधन चित्रपटाने आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केली
HIGHLIGHTS

अक्षय कुमारच्या रक्षाबंधन चित्रपटाची स्थिती फार चांगली नाही

12 व्या दिवशी केवळ 65 लाखांचा व्यवसाय झाला आहे.

चित्रपटाच्या खराब प्रदर्शनामुळे आता अनेक ठिकाणी त्याचे शो रद्द

सध्या बॉक्स ऑफिसवर साऊथ आणि बॉलिवूडसह अनेक चित्रपटांमध्ये सतत स्पर्धा सुरू आहे. पूर्वी रिलीज झालेले हिंदी चित्रपट साऊथ आणि इतर चित्रपटांच्या तुलनेत सारखे मागे पडत आहेत. चित्रपटगृहांमध्ये यापैकी एक चित्रपट, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर धमाल करताना दिसत आहे. दरवर्षी जास्तीत जास्त चित्रपट देणारा अभिनेता अक्षय कुमारसाठी हे वर्ष फारसे चांगले गेले नाही, असे चित्र दिसतंय.

हे सुद्धा वाचा : 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह Infinix Hot 12 ची पहिली सेल आज, 750 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा

खरं तर, या वर्षी रिलीज झालेल्या अभिनेत्याचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर चक्क फ्लॉप ठरले आहेत. या महिन्यात प्रदर्शित झालेला रक्षाबंधन चित्रपटाची स्थिती देखील  फार चांगली नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन 12 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र यानंतरही चित्रपटाचे कलेक्शन जास्त झाले नाही. दरम्यान, शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी चित्रपटाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे समोर आले आहेत. चित्रपटाच्या कमाईत आता मोठी घसरण झाली आहे. आकडेवारीनुसार, या चित्रपटाने रिलीजच्या 12 व्या दिवशी केवळ 65 लाखांचा व्यवसाय झाला आहे.

याआधी या चित्रपटाने रविवारी चांगली कमाई करताना 1.80 कोटींचा व्यवसाय केला होता. मात्र आता चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या खराब प्रदर्शनामुळे आता अनेक ठिकाणी त्याचे शो देखील रद्द करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत अभिनेता अक्षय कुमार आता लोकांना थिएटरकडे खेचण्यात अपयशी ठरत आहे, असे चित्र दिसत आहे. 

हे सुद्धा वाचा : OnePlus Nord 3: 'हा' लोकप्रिय फोन लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

 या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा आहे, ज्यामध्ये भाऊ-बहिणीचं अतूट प्रेम, मैत्री सगळं काही दाखवण्यात आलं आहे. पाच वर्षांनंतर U प्रमाणपत्र मिळवणारा हा चित्रपट पहिला चित्रपट ठरला आहे. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर परतली आहे. याआधी दोघेही 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात दिसले होते, ज्याला लोकांनी खूप पसंती दिली होती. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo