Raksha Bandhan 2024: बहीण-भावाच्या प्रेमाच्या सणाला ‘या’ WhatsApp मॅसेज, Video आणि Status द्वारे द्या शुभेच्छा!

Updated on 19-Aug-2024
HIGHLIGHTS

प्रत्येक रक्षाबंधनला बहीण भावाला राखी बांधून हा सण साजरा केला जातो.

एकमेकांपासून लांब राहणारे भाऊ बहिण WhatsApp द्वारे एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतात.

पूढीलप्रमाणे अनेक पर्याय वापरून तुम्ही रक्षाबंधनच्या शुभेच्छा पाठवू शकता.

Raksha Bandhan 2024: भाऊ बहिणीच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम साजरा करण्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन होय. या सणाची प्रतीक्षा प्रत्येक भाऊ-बहीण वर्षभरापासून करत असतात, अखेर आज रक्षाबंधन आहे. या सणाला प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. पण असे अनेक भाऊ बहीण आहेत, जे या सणाला एकत्र येऊ शकत नाही. तर, ते सहसा WhatsApp द्वारे एकमेकांना शुभेच्छा देतात. चला तर मग बघुयात रक्षाबंधन निमित्त विशेष शुभेच्छांची यादी-

Raksha Bandhan ला पुढील मॅसेजेसद्वारे द्या शुभेच्छा:

  • भाऊ, तू माझा संरक्षक आहेस, माझा मित्र आहेस. रक्षाबंधनाच्या या खास दिवशी, मी प्रार्थना करते की आयुष्याच्या प्रत्येक पाऊलावर तुझ्यावर ईश्वराची कृपा राहो.
  • भावा, तुझ्या साथीने माझे जीवन अधिक सुंदर आणि आनंददायक झाले आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
  • माझा रक्षक, माझा नायक, तूच माझा भाऊ. रक्षाबंधनानिमित्त तूला खूप खूप प्रेम!
  • भाऊ, तू आणि मी एकत्र असणे म्हणजेच जीवनातील सर्वात मोठी आशीर्वाद आहे. रक्षाबंधनाच्या या खास दिवसाच्या गोड शुभेच्छा!
  • आपले बंधातले प्रेम आणि अविश्वास कधीच खंडित होऊ देऊ नको. तुझ्या दिर्घायुष्यासाठी रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!
  • माझा रक्षक, माझा सल्लागार, तू सदा सुखी रहावे, यासाठी माझ्या हृदयातून प्रार्थना. रक्षाबंधनाच्या अनंत शुभेच्छा!
  • तू माझा सर्वोत्तम मित्र आणि सर्वात मोठा आधार आहेस. रक्षाबंधनानिमित्त तुझ्यासाठी भरपूर प्रेम आणि शुभेच्छा.

WhatsApp वर पुढील Status ठेऊन द्या शुभेच्छा.

  • राखी हे बंधन आहे आपल्या नात्याचे, प्रेम , विश्वासाचे, जबाबदारीचे… बहिण भावाच्या पवित्र नात्याचे, सदैव बहिण भावाची साथ सोबत राहू दे.
  • रक्षाबंधनाची गोडी, तुझ्या प्रेमाने वाढवली. माझ्या जीवनातील उजळणी, तुझ्या सहवासाने सजवली.
  • राखीच्या धाग्याप्रमाणे, नाते आहे आपले प्रेमाचे, विश्वास आणि जिव्हाळ्याचे, आधार आणि सोबतीचे, बहिण भावा-च्या नात्याची भावना, सदैव अशीच टिकुन राहू दे.
  • आठवण रक्षाबंधनाची, तुझ्या मनात सदैव राहो. भावा-बहिणीच्या नात्यातील गोडी, अशीच आयुष्यभर राहो.
  • प्रेमाचा हा सुंदर धागा, तुझ्या माझ्या नात्यातला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, तुझ्या सुखासाठी प्रार्थना करते.

रक्षाबंधनसाठी Video कडे डाउनलोड करावे?

जर तुम्हाला यु-ट्यूब किंवा इंस्टाग्राम वरून रक्षाबंधन संबंधित एखादे व्हिडिओ आवडले. तो व्हीडिओ पाठवून तुमच्या बहीण किंवा भावाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर, तुम्हाला ते डाउनलोड करावे लागेल.

  • सर्वप्रथम, तुम्हाला आवडलेल्या व्हीडिओची लिंक कॉपी करा.
  • त्यानंतर, गुगल सर्चवर यु-ट्यूब किंवा इंस्टाग्राम व्हीडिओ फ्री डाउनलोड असे सर्च करा.
  • यानंतर, तुमच्या स्क्रीनवर अनेक साईट दिसतील, ज्यासह तुम्ही व्हीडिओच्या लिंकद्वारे हे व्हीडिओ मोफत डाउनलोड करू शकता.

अशाप्रकारे, अगदी सोप्या पद्धतीने व्हीडिओ डाउनलोड करून तुम्ही WhatsApp द्वारे तुमच्या भाऊ किंवा बहिणीला शुभेच्छा पाठवू शकता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :