अमेरिकन चिपसेट निर्माता Qualcomm अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी नवीनतम आणि फ्लॅगशिप प्रोसेसर तयार करत आहे. या चिपसेटचे नाव Qualcomm Snapdragon 8 Gen 3 असेल आणि 200MP कॅमेरा सपोर्ट करेल. ताज्या माहितीनुसार, हा प्रोसेसर गेल्या वर्षी लाँच झालेल्या फ्लॅगशिप प्रोसेसरपेक्षा लवकर लाँच केला जाऊ शकतो.
हे सुद्धा वाचा : अखेर प्रतीक्षा संपली ! Oneplus 11Rची प्री-बुकिंग आजपासून, बघा किमंत आणि फीचर्स
चीनच्या Tipster डिजिटल चॅट स्टेशनने Weibo वर माहिती शेअर केली आहे की, Qualcomm आपला पुढील फ्लॅगशिप चिपसेट प्रथम लाँच करण्याचा विचार करत आहे. हे लाँच Snapdragon 8 Gen 2 च्या आधीचे असेल. मात्र, Snapdragon 8 Gen 3 च्या लाँच डेटचा उल्लेख करण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी फ्लॅगशिप चिपसेट नोव्हेंबरच्या मध्यात लाँच केला गेला होता.
टिपस्टरनुसार, Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरमध्ये Gen 2 पेक्षा 25 टक्के CPU चांगला असेल. तसेच, 20 टक्के कार्यक्षमता चांगली असेल.
कंपनीने Samsung Galaxy S 23 Ultra व्हेरिएंटमध्ये 200MP कॅमेरा वापरला आहे. आता Qualcomm च्या आगामी चिपसेटच्या मदतीने, फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये 200MP ला सपोर्ट करणे थोडे सोपे होईल. Xiaomi च्या Redmi आणि Infinix सारख्या ब्रँडने परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये 200MP कॅमेरा स्मार्टफोन लाँच केले आहेत.
हा चिपसेट फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या पुढील वेबमध्ये दिसू शकतो, असा दावाही टिपस्टरने केला आहे. म्हणजेच डिसेंबर किंवा जानेवारीनंतर लाँच होणाऱ्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये हा चिपसेट दिसेल.