Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर लाँच! या स्मार्टफोन्सना मिळेल पॉवरफुल SoC, पहा यादी

Updated on 22-Oct-2024
HIGHLIGHTS

Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर अखेर लाँच

Xiaomi, Realme पासून iQOO पर्यंत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन या प्रोसेसरसह लाँच केले जातील.

Realme ने नोव्हेंबरमध्ये लाँच होणाऱ्या फोनमध्ये देखील या प्रोसेसरची पुष्टी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून Qualcomm च्या नव्या Snapdragon 8 Elite प्रोसेसरची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यानंतर, अखेर Qualcomm Snapdragon 8 Elite लाँच करण्यात आला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, क्वालकॉमचे हे विशेष मोबाइल प्लॅटफॉर्म CPU मध्ये 45% सुधारणा, GPU परफॉर्मन्समध्ये 40% सुधारणा, पॉवर कार्यक्षमतेत 44% सुधारणा आणि 45% जलद NPU चा दावा करते.

आम्ही तुम्हाला सांगतो की, Xiaomi, Realme पासून iQOO पर्यंत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन या प्रोसेसरसह लाँच केले जातील. होय, अनेक कंपन्यांनी पुष्टी केली आहे की, ते त्यांच्या आगामी उपकरणांमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर वापरतील. जाणून घेऊयात संपूर्ण तपशील-

Also Read: New Smartphones Launched in India: दिवाळीला खरेदी करा नवा स्मार्टफोन! पहा October 2024 मध्ये लाँच झालेले फोन्स

Snapdragon 8 Elite

या स्मार्टफोन्समध्ये मिळेल नवीन प्रोसेसर

वर सांगितल्याप्रमाणे, अनेक आगामी स्मार्टफोनमध्ये ही चिपसेट देण्यात येईल. Xiaomi 15 Series, Honor Magic7 Series, OnePlus 13, iQOO 13, Realme GT 7 Pro, ROG Phone 9, nubia Z70 Ultra आणि RedMagic 10 Pro या आगामी स्मार्टफोन्समध्ये नवी चिपसेट मिळणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. Snapdragon 8 Elite चिपमध्ये असलेल्या पॉवरफुल NPU सह गेमर्ससाठी ऍडव्हान्स कूलिंग आणि ऍडव्हान्स AI चा दावा करतो. याशिवाय, Realme ने नोव्हेंबरमध्ये लाँच होणाऱ्या फोनमध्ये देखील या प्रोसेसरची पुष्टी केली आहे.

Qualcomm Snapdragon 8 Elite चिप

Qualcomm Snapdragon 8 Elite चिप मागील चिपसेटच्या तुलनेत कंपनीने या चिपसेटमध्ये Qualcomm चा सेकंड जनरेशन कस्टम Qualcomm Orion CPU वापरण्यात आला आहे. ज्याचा CPU स्पीड 4.32 GHz पर्यंत आहे. तसेच यात, मागील मॉडेलच्या तुलनेत सिंगल आणि मल्टी-थ्रेडेड बेंचमार्कमध्ये CPU कामगिरीमध्ये 45% वाढ आणि 44% चांगली उर्जा कार्यक्षमता प्रदान करण्याचा दावा केला आहे.

पुढील महिन्यात लाँच होणाऱ्या अनेक फोनमध्ये हा प्रोसेसर वापरण्याची संधी यूजर्सना मिळणार आहे. हे वापरकर्त्यांना एक जबरदस्त अनुभव देईल. तसेच, यात मोबाईल उद्योगातील सर्वात मोठा शेयर्ड कॅशे आहे, जी अत्यंत जलद डेटा पुनर्प्राप्ती प्रदान करते. कंपनीने सांगितले की, SoC एकूण 27% पर्यंत वीज बचतीचे वचन देते. एवढेच नाही तर, गेमिंग टाइम देखील 2.5 तासांपर्यंत वाढवते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :