Price Drop! प्रीमियम टॅबलेट OnePlus Pad 2 च्या किमतीत तब्बल 5000 रुपयांची कपात, पहा नवी किंमत 

Price Drop! प्रीमियम टॅबलेट OnePlus Pad 2 च्या किमतीत तब्बल 5000 रुपयांची कपात, पहा नवी किंमत 
HIGHLIGHTS

सध्या कंपनीने OnePlus Pad 2 टॅबलेटच्या किमतीत कपात केली आहे.

बँक कार्डद्वारे या टॅबवर 3000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

टॅबलेट Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे.

लोकप्रिय टेक जायंट OnePlus चा प्रीमियम टॅबलेट OnePlus Pad 2 कंपनीने मागील काळात भारतात लाँच केला होता. सध्या कंपनीने या टॅबलेटच्या किमतीत कपात केली आहे. हा टॅबलेट कंपनीने 40 हजार रुपयांच्या अंतर्गत लाँच केला होता आणि या टॅबलेटवर सध्या 5000 रुपयांची बचत करता येईल. विशेष म्हणजे या टॅबलेटमध्ये मोठी 9510mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर, फोटोग्राफीसाठी देखील उत्तम फीचर्स देण्यात येत आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात OnePlus Pad 2 ची ऑफर-

Also Read: 50MP कॅमेरासह Vivo V40 5G वर भारी ऑफर्स उपलब्ध, लेटेस्ट स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

oneplus pad 2

OnePlus Pad 2 ची किंमत आणि ऑफर

OnePlus Pad 2 टॅबच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. मात्र, आता हे मॉडेल तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. OnePlus Pad 2 चे 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेल आता 2000 रुपयांनी स्वस्तात 37,999 रुपयांना खरेदी करता येईल. यासोबतच, बँक कार्डद्वारे या टॅबवर 3000 रुपयांची सूटही दिली जात आहे. अशा प्रकारे, टॅबच्या खरेदीवर संपूर्ण 5000 रुपये वाचतील. या किमतीसह हा टॅबलेट तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करू शकता किंवा येथे क्लिक करा.

OnePlus Pad 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus Pad 2 टॅबमध्ये 12.1 इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2,120 x 3,000 पिक्सेल आहे. तुम्हाला या डिस्प्लेमध्ये 900nits ब्राइटनेस मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा टॅबलेट Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 गेमिंगसाठी उत्कृष्ट आहे, हाय फ्रेम रेट, जबरदस्त ग्राफिक्स आणि स्मूथ गेमप्ले ऑफर करतो. यात ऍडव्हान्स GPU आणि AI फिचर आहेत, जे डिव्हाइसवर उत्कृष्ट गेमिंग अनुभव ऑफर करतात.

OnePlus Pad 2
#OnePlus Pad 2

OnePlus Pad 2 मध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. तसेच, हा फोन Android 14-आधारित OxygenOS 14 वर कार्य करेल. फोटोग्राफीसाठी, OnePlus Pad 2 टॅबमध्ये फोटोग्राफीसाठी 13MP रियर कॅमेरा आहे. त्याबरोबरच, यात आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 9,510mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यासोबत तुम्हाला 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo