मनोरंजन झाले आणखी स्वस्त! Prasar Bharati चे नवे OTT ऍप लाँच, Netflix-Prime Video च्या चिंतेत वाढ
Prasar Bharati ने आपले नवे OTT स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Waves लाँच केले.
कंपनीने या OTT प्लॅटफॉर्मसाठी तीन प्रकारचे पॅक जारी केले आहेत.
या ॲपद्वारे हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मराठी इ. 12 भाषांमध्ये कंटेंट उपलब्ध
Prasar Bharati ने आपले नवे ओव्हर-द-टॉप म्हणजेच OTT स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Waves लाँच केले आहे. Waves OTT ॲपचा उद्देश दर्शकांना एकाच प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारच्या कंटेंटचा ऍक्सेस देणे होय. या ऍपमध्ये टीव्ही शो, चित्रपट, सिरीज, लाईव्ह व्हीडिओ, ऑडिओ, गेमिंग आणि ई-बुक्स इ. कन्टेंट मिळेल. महत्त्वाचे लक्षात घ्या की, भारतात नवीन OTT ॲप्स लाँच झाल्यामुळे लोकप्रिय Netflix-Prime Video सारख्या विद्यमान ॲप्सना कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान लक्षात घ्या की, कंपनीने या OTT प्लॅटफॉर्मसाठी तीन प्रकारचे पॅक जारी केले आहेत. ज्यामध्ये प्लॅटिनम प्लॅन, डायमंड प्लॅन आणि गोल्ड प्लॅन इ. प्लॅन्स आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या प्लॅन्सशी संबंधित सर्व तपशील-
Prasar Bharati launches the #WAVES #OTT platform at #IFFI !
— PIB India (@PIB_India) November 20, 2024
The platform aims to revive nostalgia while embracing modern digital trends by offering a rich mix of classic content and contemporary programming #IFFI2024 #IFFI55
(1/3) pic.twitter.com/3l3DlRNSE4
Waves ऍप
Waves OTT ऍप हे अँड्रॉइड वापरकर्ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. त्याचप्रमाणे, Apple युजर्स देखील ॲप स्टोअरवरून हे प्लॅटफॉर्म डाउनलोड करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, या ॲपद्वारे तुम्ही हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मराठी इ. 12 भाषांमध्ये कंटेंट पाहण्यास सक्षम असाल. तसेच, या ॲपमध्ये 65 लाइव्ह टीव्ही चॅनेल समर्थित आहेत. याव्यतिरिक्त, तुम्ही ॲपमध्ये गेम्स देखील ऍक्सेस करू शकता.
Waves ऍप प्लॅन्स
Platinum Plan: वेव्हजच्या प्लॅटिनम प्लॅनची वार्षिक किंमत 999 रुपये इतकी आहे. या प्लॅनसह वापरकर्ते एकाच वेळी 4 डिव्हाइसवर ॲप ऍक्सेस करण्यास सक्षम असतील. यामध्ये यूजर्सना अल्ट्रा एचडी (1080P) व्हिडिओ क्वालिटी मिळेल.
Diamond Plan: वेव्हजच्या डायमंड प्लॅनची वार्षिक किंमत 350 रुपये आहे. यातील एक प्लॅन 85 रुपयांचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 महिन्यांचा ऍक्सेस मिळेल. तसेच, तिसरा प्लॅन 1 महिन्याच्या सबस्क्रिप्शनसह येतो, ज्याची किंमत केवळ 30 रुपये आहे. या प्लॅनसह वापरकर्त्यांना एकाच वेळी 2 उपकरणांवर ॲप ऍक्सेस करता येईल. यामध्ये हाय डेफिनिशन (720P) व्हिडिओ क्वालिटी ऍक्सेस उपलब्ध आहे.
Gold Plan: प्लॅनची वार्षिक किंमत 350 रुपये आहे. यातील एक प्लॅन 85 रुपयांचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 महिन्यांचा ऍक्सेस मिळेल. तसेच, तिसरा प्लॅन 1 महिन्याच्या सबस्क्रिप्शनसह येतो, ज्याची किंमत केवळ 30 रुपये आहे. गोल्ड प्लॅन्स स्टॅंडर्ड व्हिडिओ कॉलिटी प्रदान करते, यात तुम्हाला फक्त 1 डिव्हाइसवर प्रवेश करण्याची परवानगी देते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile