फक्त Aadhaar Card ने सक्रिय होईल तुमचा PhonePe UPI, कसे ते पहा…

फक्त Aadhaar Card ने सक्रिय होईल तुमचा PhonePe UPI, कसे ते पहा…
HIGHLIGHTS

PhonePe कडून आधार-आधारित OTP प्रमाणीकरण वापरून UPI ​​सक्रियकरण सुरू.

तुम्ही आता तुमचा Phonepe UPI अगदी सहज सुरू करण्यासाठी आधार कार्ड वापरू शकता.

आधार-आधारित UPI ऑनबोर्डिंग फ्लो जारी करणारे PhonePe हे पहिले UPI (TRAP) ऍप आहे. ​​

अग्रगण्य फिनटेक प्लॅटफॉर्म PhonePe ने नुकतेच जाहीर केले आहे की, त्यांनी आधार-आधारित OTP प्रमाणीकरण वापरून UPI ​​सक्रियकरण सुरू केले आहे. अर्थात, तुम्ही आता तुमच्या आधार कार्डसह तुमचा PhonePe UPI सहज सुरू करू शकता. PhonePe हे आधार-आधारित UPI ऑनबोर्डिंग फ्लो रिलीज करणारे पहिले UPI थर्ड पार्टी अप्लिकेशन प्रोव्हायडर (TRAP) ऍप ​​आहे, जे आता कोट्यवधी भारतीयांना UPI इकोसिस्टमचा अखंडपणे आणि सुरक्षितपणे प्रथमच भाग बनण्यास सक्षम करेल, असे कंपनीने म्हटले आहे. 

आतापर्यंत डेबिट कार्ड अनिवार्य होते… 

पूर्वीच्या UPI ऑनबोर्डिंग फ्लो अंतर्गत, UPI नोंदणी प्रक्रियेदरम्यान वापरकर्त्याला UPI पिन सेट करण्यासाठी वैध डेबिट कार्ड अनिवार्य होते. ज्यामुळे डेबिट कार्ड नसलेल्या मोठ्या संख्येने भारतीय बँक खातेधारकांपर्यंत प्रवेश प्रतिबंधित होता. आधार ऑनबोर्डिंगला UPI शी लिंक केल्याने हे निर्बंध हटवले जातील आणि पूर्वी कमी सेवा न मिळालेल्या लोकसंख्येला डिजिटल पेमेंटची सुविधा आणि फायदे अनुभवता येतील.

PhonePe पेमेंट्सचे प्रमुख दीप अग्रवाल म्हणाले, “आम्ही आमच्या वापरकर्त्यांसाठी आधार-आधारित प्रमाणीकरण ऑफर करणारे पहिले फिनटेक प्लॅटफॉर्म म्हणून उत्साहित आहोत, ज्यामुळे UPI ऑनबोर्डिंग फ्लो आणखी सोपा आणि अधिक समावेशक होईल. आम्हाला विश्वास आहे की, हा RBI, NPCI आणि UIDAI चे एक अतिशय प्रगतीशील पाऊल आहे आणि डिजिटल आर्थिक समावेशाचे एक उत्तम उदाहरण आहे, जो UIDAI चा आधार कार्यक्रम चालवण्यास सक्षम आहे."

नवीन प्रवाहात, आधार ई-KYC फ्लो हा फोनपे ऍपवरील UPI ऑनबोर्डिंग प्रवासाचा भाग बनवला जाईल.

'कशा'प्रकारे होईल हे काम?

> हा पर्याय निवडणाऱ्या वापरकर्त्यांनी ऑनबोर्डिंग प्रक्रिया सुरू करण्यासाठी फक्त त्यांच्या आधार क्रमांकाचे शेवटचे 6 अंक प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

> त्यानंतर त्यांना प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी UIDAI आणि त्यांच्या संबंधित बँकेकडून OTP प्राप्त होईल.

> त्यानंतर, ग्राहक PhonePe ऍपवर पेमेंट आणि बॅलन्स चेक यासारख्या सर्व UPI फिचरचा वापर करू शकतील.

अग्रवाल म्हणाले,"यामुळे संपूर्ण UPI इकोसिस्टमचा विस्तार होण्यास मदत होईल आणि नवीन ग्राहकांना डिजिटल पेमेंट्सच्या पटीत आणण्यास देखील मदत होईल. UPI हे जागतिक उदाहरण बनले आहे आणि जगभरातील देश त्याची अंमलबजावणी करू पाहत आहेत. UPI ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी NPCI सोबत मिळून आम्ही काम करत आहोत."

415 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्यांसह, चारपैकी एक भारतीय आता PhonePe वर आहे. कंपनीने देशातील 33 दशलक्ष ऑफलाइन व्यापाऱ्यांचे यशस्वीरित्या डिजिटायझेशन केले आहे, ज्यामध्ये 99 % पिन कोड समाविष्ट आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo