PhonePe ने देखील सुरू केली UPI Lite सेवा, मिळतील अप्रतिम लाभ

Updated on 06-May-2023
HIGHLIGHTS

PhonePe ने UPI Lite सर्व्हिस सुरू केली आहे.

अलीकडेच, Paytm ने देखील UPI Lite सर्विस दाखल केली.

वापरकर्ते पेमेंट ॲपमध्ये 2,000 रुपयांपर्यंत ठेवू शकतात.

PhonePe च्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. PhonePe ने  UPI Lite सर्व्हिस सुरू केली आहे. यापूर्वी, Paytm ने देखील UPI Lite सर्विस दाखल केली. डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी पेमेंट ॲप्स ही सेवा सुरू करत आहेत. UPI Lite विशेषत: कमी मूल्याच्या व्यवहारांसाठी वापरला जातो. याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा…

 UPI Lite सर्विसद्वारे वापरकर्ते UPI पिन न टाकता 200 रुपयांपेक्षा कमी पेमेंट करू शकतात. 

UPI Lite सर्विस म्हणजे काय?

भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये UPI Lite सेवा सुरू केली. UPI आणि इतर डिजिटल पेमेंट प्रमाणे, NPCI ही सेवा नियंत्रित करते. हे पेमेंट वॉलेटसारखे आहे, ज्यामध्ये युजर्स अकाऊंटमधून 2,000 रुपयांपर्यंतची रक्कम ठेवू शकतात. यानंतर, पिन न टाकता कमी किमतीच्या व्यवहारांसाठी UPI पेमेंट करता येईल. 

UPI Lite सर्विसचे लाभ

– वापरकर्ते पिन न टाकता या सेवेद्वारे 200 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पेमेंट करू शकतील.

– अनेक वेळा वापरकर्ते छोट्या व्यवहारांसाठी रोख वापरतात कारण त्यांना UPI पेमेंट करण्यासाठी वारंवार पिन टाकावा लागतो. 

– RBI आणि NPCI ने युजर्सची ही समस्या लक्षात घेऊन गेल्या वर्षी UPI Lite सेवा सुरू केली आहे. 

– यामध्ये, वापरकर्ते पेमेंट ॲपमध्ये 2,000 रुपयांपर्यंत ठेवू शकतात.

– त्यानंतर, पिन न टाकता 200 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेचे व्यवहार करू शकतात.

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :