Income Tax Payment feature: PhonePe वर लाँच झाला नवा महत्त्वाचा फिचर, वाचा डिटेल्स
PhonePe ने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन 'Income Tax Payment' फीचर लाँच केले.
नव्या फीचरसाठी कंपनीने PayMate सोबत भागीदारी केली आहे.
यावर्षी ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.
आताच्या जगात स्वतःकडे कॅश ठेवणारे लोक तुम्हाला कमीच मिळतील. कारण आता सर्व पेमेंट ऑनलाईनरित्या करण्याची अगदी सोपी सोया करण्यात आलेली आहे. आम्ही तुम्हला सांगतो की, आतापर्यंत तुम्ही PhonePe द्वारे छोटे UPI पेमेंट, मोबाईल फोन रिचार्ज आणि बिल पेमेंट करायचो, पण आता तुम्ही या ऍपद्वारे तुमचा टॅक्स भरण्यास देखील सक्षम असाल. होय, PhonePe ने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन 'Income Tax Payment' फीचर लाँच केले आहे.
हे नवीन फिचर करदात्यांना PhonePe द्वारे कर भरणे अगदी सोपे करणार आहे. ही सेवा वैयक्तिक आणि व्यवसाय या दोन्हीं युजर्ससाठी सुरू करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नव्या फीचरसाठी कंपनीने PayMate सोबत भागीदारी केली आहे. PayMate ही डिजिटल B2B पेमेंट्स आणि सर्व्हिस प्रोवाईडर कंपनी आहे. जर तुम्ही देखील करदाते असाल आणि तुम्ही आतापर्यंत तुमचा कर भरला नसेल, तर PhonePe चे हे फिचर तुमचे काम अगदी सोपे करणार आहे.
ITR 2023 भरण्याची शेवटची तारीख
लक्षात घ्या की, यावर्षी ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. यंदा ही तारीख पुढे वाढवली जाणार नाही, अशी देखील माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही करदाते असाल तर 31 जुलैपूर्वी तुमचा ITR भरून घ्या.
'Income Tax Payment' फीचर
PhonePe युजर्स ऍपवर जाऊन UPI किंवा क्रेडिट कार्डद्वारे त्यांचा टॅक्स भरू शकतात. क्रेडिट कार्ड पेमेंटद्वारे वापरकर्त्यांना 45 दिवसांपर्यंत व्याजमुक्त कालावधी मिळणार आहे. ज्यासह युजर्सना रिवॉर्ड पॉइंट देखील मिळेल. PhonePe द्वारे टॅक्स भरल्यानंतर, वापरकर्त्यांना एक Unique Transaction Reference (UTR) नंबर मिळेल. PhonePe द्वारे कर कसा भरावा त्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे:
> सर्वप्रथम तुम्ही आपल्या स्मार्टफोनवर PhonePe ऍप उघडा.
> आता तुम्हाला PhonePe च्या होमस्क्रीनवर एक नवीन 'Income Tax' आयकॉन दिसेल.
> यानंतर तुम्हाला 'Type Of Tax' सिलेक्ट करावा लागेल.
> यानंतर असेंन्टमेन्ट इयर भरा.
> आता तुम्हाला तुमचे पॅन कार्ड तपशील भरावे लागणार आहेत.
> यानंतर टॅक्स चालान अकाउंट एंटर करा.
> आता युजर टॅक्स माउंट UPI किंवा क्रेडिट कार्डद्वारे भरू शकता.
> पेमेंट केल्यानंतर, रक्कम तुमच्या टॅक्स पोर्टलवर क्रेडिट केली जाणार आहे.
UPI Lite सर्व्हिस
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये UPI Lite सेवा सुरू केली. UPI आणि इतर डिजिटल पेमेंट प्रमाणे, NPCI ही सेवा नियंत्रित करते. पेटीएमने या वर्षी मार्चमध्ये ही सेवा सुरू केली होती. त्यानंतर, PhonePe ने अलिडकेच देखील ही सेवा सुरु केली आहे. हे पेमेंट वॉलेटसारखे आहे, ज्यामध्ये वापरकर्ते त्यांच्या खात्यातून 2,000 रुपयांपर्यंतची रक्कम ठेवू शकतात. यानंतर, पिन न टाकता छोट्या व्यवहारांसाठी UPI पेमेंट करता येईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile