रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्देशानुसार Paytm पेमेंट्स बँक (PPBL) च्या बॅलेन्स, क्रेडिट व्यवहार आणि FASTag रिचार्ज यासारख्या सेवा आज म्हणजेच 15 मार्चपासून बंद करण्यात आल्या आहेत. Paytm पेमेंट्स बँक ग्राहकांची खाती, वॉलेट, फास्टॅग आणि इतर उपकरणांमध्ये ठेवी किंवा टॉप-अप स्वीकारणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, RBI ने या निर्णयामागे नियमांचे पालन न करणे आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्यांचा उल्लेख केला आहे.
हे सुद्धा वाचा: Loksabha Election 2024: Voter ID Card बनवण्यासाठी घरबसल्या Online अप्लाय करा, बघा सोपी प्रक्रिया
मनी डिपॉझिट: आजपासून वापरकर्ते त्यांच्या PPBL खात्यांमध्ये पैसे जमा करू शकणार नाहीत. तुमच्या खात्यातील पगार क्रेडिट, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा सबसिडी देखील बंद केली जाईल.
UPI फंक्शन्स: तुम्हाला 15 मार्चपासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरता येणार नाही.
FASTag रिचार्ज: नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने एका ऍडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, तुम्ही PPBL द्वारे जारी केलेले FASTag रिचार्ज करू शकत नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला इतर कोणत्याही बँकेने जारी केलेला नवीन FASTag खरेदी करावा लागेल.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, NHAI ने अधिकृत बँक आणि नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्यांची (NBFC) यादी अपडेट केली आहे, जे FASTag जारी करू शकतात. या यादीत 39 बँक आणि NBFC चा समावेश आहे. या यादीत Airtel पेमेंट्स बँक, Axis बँक लिमिटेड, बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, HDFC बँक, ICICI बँक, IDFC फर्स्ट बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक इ. चा समावेश आहे.
Paytm वॉलेट: 15 मार्चपासून, तुम्ही PPBL वॉलेटसाठी टॉप-अप आणि व्यवहार सुविधा वापरण्यास अक्षम असाल. परंतु तुम्हाला वॉलेटमधील विद्यमान निधी ट्रान्सफर आणि पेमेंटसाठी वापरता येईल.
विड्रॉल और मनी ट्रांसफर: तुम्ही तुमच्या PPBL खात्यांमधून रिफंड म्हणून ट्रान्सफर करू शकता. याशिवाय, विनिंग्स आणि कॅशबॅकची प्रक्रिया पार्टनर बँकेद्वारे केली जाईल.
व्यापाऱ्यांसाठी: Paytm QR कोड, Paytm Soundbox किंवा Paytm PoS (पॉइंट-ऑफ-सेल) टर्मिनलद्वारे पेमेंट स्वीकारणारे व्यापारी 15 मार्चनंतरही ते वापरू शकतात. पण, जर निधीची पावती आणि ट्रान्सफर PPBL व्यतिरिक्त इतर बँकेशी कनेक्ट केलेले असतील.