लोकप्रिय ऑनलाईन पेमेंट ऍप Paytm ने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन UPI Statement Download फिचर सादर केले आहे. हे फिचर विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे, जे दिवसातून अनेकदा UPI पेमेंट करतात आणि पेमेंट्सचे हिशोब ठेऊ शकत नाही. असे अनेकदा होते की, आपण दिवसभरात अनेक लहान-मोठे UPI पेमेंट करतो, ज्यामुळे प्रत्येक पेमेंटचा हिशोब ठेवणे कठीण होते. आता Paytm ने आपल्या युजर्सच्या या समस्येवर निराकरण म्हणून नवे फिचर रोलआऊट केले आहे.
Also Read: JioTV+ चे नवे AI Sensor फीचर लाँच! कुटुंबासोबत पाहताना ऍडल्ट सीन होणार ब्लर
Paytm ने आपल्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर हँडलद्वारे नवीन UPI स्टेटमेंट डाउनलोड फिचरबद्दल माहिती दिली आहे. या फिचरद्वारे तुम्ही तुमच्या UPI पेमेंट खर्चाचा हिशोब सहज ठेऊ शकता. त्याबरोबरच, हे नवीन फीचर तुमच्यासाठी टॅक्स फाइलिंग दरम्यान खूप उपयुक्त ठरणार आहे, असे देखील कंपनीने सांगितले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हे फिचर सध्या PDF फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, UPI Statement Download फिचर सध्या PDF फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे. लवकरच हे नवे फिचर एक्सेल फॉरमॅटमध्येही सादर केले जाईल. या फीचर अंतर्गत तुम्हाला कोणत्याही तारखेचे आणि आर्थिक वर्षाचे विवरण सहज मिळण्यास मदत होईल.