बॉलिवूडचा बादशाह म्हणेजच शाहरुख खानने तब्बल 5 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुखने दमदार कमबॅक केला आहे. शाहरुखचा नवा चित्रपट 'पठान' दररोज कमाईचे रेकॉर्ड मोडत आहेच. त्याबरोबरच, चाहते या चित्रपटाच्या OTT रिलीजसाठीही आतुर आहेत. आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पठान लवकरच OTT वर प्रदर्शित होणार आहे. Amazon Prime Video ने चित्रपटाचे OTT राईट्स विकत घेतले आहेत.
हे सुद्धा वाचा : Infinix Smart 6 वर मिळतेय सर्वात मोठी सूट, बघा कुठे मिळतेय भारी ऑफर…
एका वृत्तानुसार, Amazon Prime Video ने पठानचे OTT अधिकार जवळपास 100 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. Amazon प्राइम व्हिडिओने कोणत्या तारखेला आपल्या प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करेल याबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, या चित्रपटाची डिजिटल रिलीज 3 महिन्यांत होईल. म्हणजेच एप्रिलमध्ये लोकांना हा चित्रपट घरबसल्या टीव्ही आणि मोबाईलवर सहज पाहता येईल.
या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्याबरोबरच, सलमान खानने यात छोटी भूमिका केली आहे. यशराज प्रॉडक्शनच्या 'स्पाय युनिव्हर्स' अंतर्गत बनलेला हा चौथा चित्रपट आहे. रिलीजच्या 3 दिवसांतच या चित्रपटाच्या एकूण कलेक्शनने 300 कोटींचा आकडा पार केला आहे.
'पठान'चे तिकीट आता खूप महाग झाले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काही दिवस प्रतीक्षा करून Amazon Prime Video वर ते मोफत पाहू शकता. या प्लॅटफॉर्मचा सबस्क्रिप्शन प्लॅन 179 रुपये प्रति महिना पासून सुरू होतो, ज्यामध्ये 30-दिवसांची चाचणी विनामूल्य उपलब्ध आहे.