चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला Amazon Prime Video सबस्क्रिप्शनची आवश्यकता
प्लॅन्सची किंमत 179 रुपयांपासून सुरू
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेताशाहरुख खानचा 'पठान' हा चित्रपट जानेवारीत रिलीज झाला होता. या चित्रपटाने खूप प्रशंसा मिळवली आणि रेकॉर्डब्रेक कमाई केली. हा चित्रपट जर तुम्ही चित्रपटगृहात पहिला नसेल, तर तुम्ही तो आता OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. हा चित्रपटाची 22 मार्च रोजी Amazon Prime Video वर स्ट्रीमिंग सुरू होईल. OTT प्लॅटफॉर्मने स्वतः याची पुष्टी केली आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ या भाषांमध्ये पाहता येणार आहे.
तुमच्याकडे Prime Video सबस्क्रिप्शन नसल्यास, तुम्ही 30 दिवसांच्या ट्रायलसह प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय यूजर्स सबस्क्रिप्शन प्लॅन घेऊ शकतात. प्राइम व्हिडिओ सब्स्क्रिप्शन 179 रुपयांच्या मंथली प्लॅनसह सुरू होतो.
याशिवाय, 459 रुपयांचा प्लॅन येतो, जो 3 महिन्यांसाठी वैध असतो. दुसरीकडे, जर तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी मेंबरशिप हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला 1,499 रुपये द्यावे लागतील. यासोबतच Amazon प्राइम लाइट सबस्क्रिप्शन प्लॅन देखील ऑफर करतो, ज्याची किंमत 999 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना Amazon Music, Prime Reading, Prime Gaming ची सुविधा मिळणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.