Pathaan Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळेल गिफ्ट, टीझर होणार का रिलीज?

Pathaan Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळेल गिफ्ट, टीझर होणार का रिलीज?
HIGHLIGHTS

'पठाण' चित्रपटाचा टिझर शाहरुख खानच्या वाढदिवशी रिलीज होण्याची शक्यता

प्रेक्षकांना 'पठाण' चित्रपट आवडेल तर 'पठाण 2' देखील तयार होणार आहे."

शाहरुखचे मोस्ट 3 अवेटेड चित्रपट

बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान असा सुपरस्टार आहे, ज्याचे चाहते स्वतःच त्यांच्या चित्रपटांबद्दल सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड करतात. शाहरुख आता आगामी 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील अभिनेत्याचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. चाहते आता चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरची वाट पाहत आहेत आणि म्हणूनच त्यांना अभिनेत्याच्या चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित करायचा आहे. 

हे सुद्धा वाचा : Netflix ने यूजर्सना दिला झटका! आता पासवर्ड शेअर करण्यासाठी लागेल एक्सट्रा चार्ज, वाचा डिटेल्स

आम्ही तुम्हाला सांगतो की, अभिनेत्याचा वाढदिवस 2 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे काहींना अशी अपेक्षा आहे की, चित्रपटाचा टीझर 2 नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.

याआधी एका लाइव्ह सत्रादरम्यान शाहरुख 'पठाण'च्या ट्रेलरबद्दल बोलला होता. तो म्हणाला की, ''मी पठाणच्या ट्रेलरबद्दल खूप उत्सुक आहे आणि तो नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये रिलीज होऊ शकतो. पण सध्या मी त्याबाबत  निश्चितपणे काही सांगू शकत नाही कारण टीम सध्या चित्रपट पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे." 

शाहरुख पुढे म्हणाला की, 'मला आशा आहे की तुम्हाला चित्रपट नक्की आवडेल. हा चित्रपट बनवण्यासाठी आपण सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. प्रेक्षकांना म्हणजेच तुम्हाला 'पठाण' चित्रपट आवडेल तर 'पठाण 2' देखील तयार होणार आहे." 

पठाणबद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने या चित्रपटाविषयी सांगितले होते. पठाणबद्दलची प्रत्येक घोषणा म्हणजे चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या म्हणतील कोडे सोडवण्यासारखी आहे. 

शाहरुखचे मोस्ट अवेटेड चित्रपट 

पठाण हा शाहरुखच्या मोस्ट अवेटेड 3 चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाशिवाय शाहरुख 'जवान' आणि 'डंकी' या चित्रपटात दिसणार आहे. 'जवान'मध्ये अभिनेत्री नयनतारा त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत असून 'डंकी'मध्ये तो अभिनेत्री तापसी पन्नूसोबत दिसणार आहे. शाहरुख शेवटचा 2018 मध्ये आलेल्या झिरो चित्रपटात दिसला होता, जो फ्लॉप ठरला होता. यानंतर शाहरुख दीर्घकाळानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo