सध्या OTT चे वाढते ट्रेंड बघता आजकाल प्रत्येकजण OTT प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन घेतो. मात्र, काही युजर्स असे देखील आहेत, जे आपल्या मित्राचे पासवर्ड घेऊन OTT प्लॅटफॉर्म्सवर आवडते शोज आणि चित्रपट पाहतात. अशा परिस्थितीत, Netflix आणि Prime Video ने पासवर्ड शेअरिंगबद्दल अनेक बदल केले आहेत. अनेक प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म्सने पासवर्ड शेअरिंग बंद केली आहे. मात्र, हा बदल आता प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Disney+Hotstar ने देखील केला आहे.
होय, हॉटस्टारवर आता मित्रांचे पासवर्ड घेऊन चित्रपट पाहणाऱ्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने पासवर्ड शेअरिंग पॉलिसी बदलली असून नवीन नियमावर सप्टेंबरमध्ये काम सुरू केले जाईल, अशी माहिती देखील मिळाली आहे.
Also Read: iQOO Z9s सीरीज 21 ऑगस्ट रोजी भारतात होणार लाँच, आगामी स्मार्टफोन्समध्ये काय मिळेल विशेष?
Disney च्या CEO ही आपल्या टीमसोबत नवीन पासवर्ड शेअरिंग पॉलिसीवर काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. पासवर्ड शेअरिंग बंद केल्यावर कंपनीच्या वापरकर्त्यांमध्ये वाढ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. म्हणजेच Disney+Hotstar यूजर बेस झपाट्याने वाढेल. ते म्हणाले की, आता लवकरच मित्रांच्या खात्यातून आवडते शो आणि चित्रपट पाहणे बंद होणार आहे. मात्र, तुम्ही स्वतःच्या खात्यावर विना अडथडा चित्रपट आणि शोज पाहू शकता. कारण कंपनी फक्त पासवर्ड शेअरिंगवर बंदी घालणार आहे.
पासवर्ड शेअरिंगच्या धोरणात बदल केले असेल, तरीही तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत पासवर्ड शेअर करण्यास सक्षम असाल. होय, कंपनीने कुटुंबातील सदस्यांमध्ये पासवर्ड शेअर करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. यापूर्वी, लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix ने देखील असे बदल केले आहेत. Disney+Hotstar वापरकर्त्यांसाठी नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.
मित्रांना हवे असल्यास ते अकाउंट शेअरिंगचे ऑप्शन निवडू शकतात. याचाच अर्थ असा की, जर तुम्हाला तुमचे अकाउंट मित्रांसोबत शेअर करायचे असेल तर, तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील. यासाठी पेमेंट केल्यानंतर तुम्ही अकाउंट सहज शेअर करू शकता. मात्र, जर तुम्ही स्वतःच सबस्क्रिप्शन खरेदी केले तर तुम्ही उत्तम रीतीने तुमच्या आवडत्या शो आणि चित्रपटांचा आनंद घेऊ शकता.