मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी पेंटलने बाजारात आपला नवीन टू-इन-वन टॅबलेट पेंटा T-पॅड WS1001Q लाँच केला आहे. कंपनीने आपल्या ह्या टू-इन-वन टॅबलेटची किंमत १०,९९९ रुपये ठेवली आहे आणि ह्याला एक्सक्लूसिवरित्या ऑनलाइन शॉपिंग साइट शॉपक्लूजवर खरेदी केले जाऊ शकते.
ह्या टॅबलेटचे वैशिष्ट्य म्हणजे, ह्याला इनबिल्ट 3G सिम सपोर्ट आणि वेगळे अटॅच करण्यासाठी असलेल्या कीबोर्ड(ट्रॅकपॅडसह) सपोर्टसह लाँच केला गेला आहे. विंडोज 10 होमसह येणारा हा टॅबलेट मल्टी-लँग्वेज सपोर्ट करतो.
हेदेखील पाहा – हे आहेत आकर्षक असे वॉटरप्रुफ गॅजेट्स, जे पाण्यात भिजले तरी होत नाही खराब
ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्या टॅबलेटमध्ये 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा टॅबलेट 7000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 3G, वायफाय 802.11 B/G/N, ब्लूटुथ 4.0, 1xUSB 3.0 स्लॉट, मिनी HDMI सारखे फीचर्स दिले गेले आहेत. पेंटल पेंटा T-पॅड WS1001Q टू-इन-वन डिवाइस काळ्या रंगात मिळेल.
हेदेखील वाचा – भारतात मे महिन्यात येईल Nextbit Robin चा ‘Cloud first’ स्मार्टफोन
हेदेखील वाचा – CREO Mark 1 स्मार्टफोन: दर महिना स्वत:च अपडेट करणार ऑपरेटिंग सिस्टम