पेंटल पेंटा T-पॅड WS1001Q टू इन वन टॅबलेट लाँच

पेंटल पेंटा T-पॅड WS1001Q टू इन वन टॅबलेट लाँच
HIGHLIGHTS

ह्याला इनबिल्ट 3G सिम सपोर्ट आणि वेगळे अटॅच करण्यासाठी असलेल्या कीबोर्ड(ट्रॅकपॅडसह)सपोर्टसह लाँच केला गेला आहे.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी पेंटलने बाजारात आपला नवीन टू-इन-वन टॅबलेट पेंटा T-पॅड WS1001Q लाँच केला आहे. कंपनीने आपल्या ह्या टू-इन-वन टॅबलेटची किंमत १०,९९९ रुपये ठेवली आहे आणि ह्याला एक्सक्लूसिवरित्या ऑनलाइन शॉपिंग साइट शॉपक्लूजवर खरेदी केले जाऊ शकते.


ह्या टॅबलेटचे वैशिष्ट्य म्हणजे, ह्याला इनबिल्ट 3G सिम सपोर्ट आणि वेगळे अटॅच करण्यासाठी असलेल्या कीबोर्ड(ट्रॅकपॅडसह) सपोर्टसह लाँच केला गेला आहे. विंडोज 10 होमसह येणारा हा टॅबलेट मल्टी-लँग्वेज सपोर्ट करतो.

हेदेखील पाहा – हे आहेत आकर्षक असे वॉटरप्रुफ गॅजेट्स, जे पाण्यात भिजले तरी होत नाही खराब

ह्या टॅबलेटच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात १०.१ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे आणि हा एक IPS 10 पॉइंट कॅपेसिटीव्ह टच डिस्प्ले आहे. ह्या टॅबलेटमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे. टॅबलेटमध्ये मायक्रो-एसडी कार्ड देण्यात आले आहे ज्याने स्टोरेज वाढवता येऊ शकते. हा डिवाइस क्वाड-कोर इंटेल अॅटम X5 प्रोसेसरसह 2GB रॅम सह सादर करण्यात आली आहे. ह्यात ग्राफिक्ससाठी इंटेल एचडी ग्राफिक्स 5300 GPU दिला गेला आहे.

ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्या टॅबलेटमध्ये 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा टॅबलेट 7000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 3G, वायफाय 802.11 B/G/N, ब्लूटुथ 4.0, 1xUSB 3.0 स्लॉट, मिनी HDMI सारखे फीचर्स दिले गेले आहेत. पेंटल पेंटा T-पॅड WS1001Q टू-इन-वन डिवाइस काळ्या रंगात मिळेल.
 

हेदेखील वाचा – भारतात मे महिन्यात येईल Nextbit Robin चा ‘Cloud first’ स्मार्टफोन
हेदेखील वाचा – 
CREO Mark 1 स्मार्टफोन: दर महिना स्वत:च अपडेट करणार ऑपरेटिंग सिस्टम

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo