ह्यात 7.0 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1024x600 पिक्सेल आहे. ह्यात 1GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GBची रॅम दिली गेली आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी पेंटल टेक्नॉलॉजीने आपला नवीन आणि स्वस्त 4G टॅबलेट टी-पॅड अल्ट्रा भारतीय बाजारात लाँच केला आहे. भारतात ह्याची किंमत ६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा टॅबलेट ऑनलाईन शॉपिंग साइट होमशॉप 18 वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
जर पेंटल टी-पॅड अल्ट्राच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ७.० इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1024×600 पिक्सेल आहे. ह्यात 1GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅम दिली आहे. हा 8GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवता येईल.
ह्यात ड्युल LED फ्लॅश सह ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. ह्यात एचडी क्वालिटीचा व्हिडियो बनवला जाऊ शकतो. ह्यात ३०००mAh ची बॅटरी दिली आहे,
त्याशिवाय हा नवीन टॅबलेट ५.१ लॉलीपॉप अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G, 3G, ड्युल सिम,ब्लूटुथ आणि वाय-फाय वैशिष्ट्य दिले गेले आहे. भारतीय बाजारात पेंटल अल्ट्रा टॅबलेट निळा, लाल आणि करड्या रंगात उपलब्ध होईल.