ह्यात २० इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन ३८४०x२५६० पिक्सेल आहे. त्याचबरोबर ह्यात इंंटेल कोरची पाचवी पिढी i5 प्रोसेसर आणि ८जीबीचे रॅमसुद्धा समाविष्ट आहे. हा टॅबलेट २५६जीबीच्या साटा स्टोरेजने सुसज्ज आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता पॅनेसोनिकने आपला नवीन टॅबलेट टफपॅड FZ-Y1 लाँच केला आहे. हा विश्वातील पहिला 4k डिस्प्ले असलेला टॅबलेट आहे. हा डिवाईस बराच बारीक आणि पातळ आहे. ह्याची किंमत २,४०,००० रुपये आहे. पॅनेसोनिक टफपॅड FZ-Y1 टॅबलेटसोबत ३ वर्षाची वॉरंटीसुद्धा मिळणार आहे.
जर ह्या टॅबलेटच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात २० इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन ३८४०x२५६० पिक्सेल आहे. त्याचबरोबर ह्यात इंटेल कोर ची पाचवी पिढीi5 प्रोसेसर आणि ८जीबीचे रॅमसुद्धा समाविष्ट आहे. हा टॅबलेट २५६जीबीच्या साटा स्टोरेजने सुसज्ज आहे.
पॅनेसोनिक टफपॅड FZ-Y1 टॅबलेटमध्ये १२.५MAM ची स्लिम बॉडी आहे आणि ह्या डिव्हाईसचे वजन २.४१ किलोग्रॅम आहे. ह्यात व्हिडियो कॉलिंगसाठी फ्रंट कॅमे-याची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. हा विंडोज ८.१ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात USB 3.0 पोर्ट, SDXC कार्ड स्लॉट, हेडफोन जॅक दिले गेले आहे. त्याशिवाय टॅबलेटमध्ये लॅन पोर्ट, HDMI 2.0 पोर्ट आणि मिनी डिस्प्ले पोर्ट उपलब्ध आहे. त्याचबरोबर हा टॅबलेट ब्लूटुथ आणि वाय-फायला सपोर्ट करतो.