पॅनेसोनिकने आपल्या नवीन टॅबलेट टफपॅड FZ-A2 ला लाँच केले आहे. ह्या टॅबलेटची किंमत 939 GBP (जवळपास ८९,४०० रुपये) आहे. हा टॅबलेट सध्यातरी युएसमध्ये लाँच केला आहे. आणि हा जुलै महिन्यात सेलसाठी उपलब्ध होईल.
ह्या टॅबलेटमध्ये 10.1 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1200 पिक्सेल आहे. हा डिवाइस 1.44GHz इंटेल अॅटम x5-Z8550 प्रोसेसर आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात इंटेल HD ग्राफिक्स ४०० सुद्धा आहे. ह्या डिवाइसमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…
हा टॅबलेट 8 मेगापिक्सेलच्या रियर कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्या कॅमे-यासह LED फ्लॅशसुद्धा दिली आहे. हा टॅबलेट अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या टॅबलेटमध्ये 4G LTE, वायफाय, GPS, ब्लूटुथ, USB टाइप-C पोर्ट आणि एक HDMI पोर्ट दिला आहे. टॅबलेट डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट आहे आणि हा IP 65 प्रमाणित आहे.
हेदेखील पाहा – वनप्लस 3 स्मार्टफोन: एक्सक्लुसिव्हली अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध
हेदेखील वाचा – नुकतेच लाँच झालेल्या शाओमी आणि मिजू स्मार्टफोनमध्ये कोण आहे श्रेष्ठ???