नागरिकांना दिलासा ! PAN-Aadhar लिंक करण्याची मुदत वाढवली, ‘ही’ आहे अंतिम तारीख
PAN-Aadhar सह लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023
या तारखेनंतर तुमचा पॅन कार्ड निष्क्रिय होईल.
नागरिकांना 1000 रूपयांचा दंड भरावा लागेल.
जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला हे माहित असेलंच की, 31 मार्च 2023 पर्यंत सर्व नागरिकांना त्यांचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करावे लागेल. सरकारने या मुदतीत पॅनकार्ड असलेल्या सर्व लोकांना त्यांचे PAN कार्ड -Aadhar कार्डशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. मात्र, नुकत्याच आलेल्या बातमीनुसार पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे.
PAN -Aadhar लिंक करण्याची अंतिम तारीख :
मात्र, नुकत्याच आलेल्या बातमीनुसार पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT ने 28 मार्च रोजी मंगळवारी एका अधिसूचनेत म्हटले आहे.
The last date for linking of PAN-Aadhaar extended has been extended to 30th June 2023 in order to provide some more time to the taxpayers
PAN can be linked with Aadhaar by accessing the following link: https://t.co/YIQIEa0iUw .
Details: https://t.co/Ci80QWBtkQ @UIDAI
— PIB India (@PIB_India) March 28, 2023
जर तुम्ही अजून PAN -Aadhar लिंक केले नसेल तर हे काम तुम्ही आजच करा. त्यानंतर, तुम्हाला 1,000 रुपये दंड भरावा लागेल.
पॅन-आधार लिंक कसे कराल ?
जर तुम्ही अजून पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर, खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
– सर्वप्रथम तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ वर जावे लागेल.
– त्यानंतर तुम्हाला Quick Links विभागात जाऊन Link Aadhaar वर क्लिक करावे लागेल.
– त्यानंतर दुसऱ्या पेजवर जा आणि तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड तपशील टाका.
– त्यानंतर तुम्हाला 'I validate my Aadhaar Details' यावर चेक मार्क करावा लागेल.
– त्यानंतर Continue वर क्लिक करा.
– तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल, तो एंटर करा. त्यानंतर Validate वर क्लिक करा.
– त्यानंतर पेनल्टी भरा. त्यानंतर तुमचा पॅन-आधार लिंक होईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile