Pager Blast: लेबनॉनला हादरवणारे पेजर म्हणजे काय? कसे करतो काम? अजूनही त्याचा वापर का? जाणून घ्या सर्व डिटेल्स

Updated on 18-Sep-2024
HIGHLIGHTS

लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये पेजर स्फोट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे.

पेजर हे एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस असून त्याच्या उपयोग मॅसेज पाठवण्यासाठी केला जातो.

1985 ते 1990 या काळात हे उपकरण खूप लोकप्रिय होते.

Pager Blast: लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये पेजर स्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या लढवय्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला असून 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे, आता सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक उपकरण ‘पेजर’ हा चर्चेचा विषय बनला आहे. पेजर म्हणजे काय? त्याच्या स्फोट कसा झाला? काय आणि कसे काम करतो? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडत असतील. चला तर मग पाहुयात तुमच्या प्रश्नांची उत्तरे- 

Also Read: Aadhaar Card Update: UIDAI ने परत वाढवली Free आधार कार्ड अपडेटची तारीख, जाणून घ्या नवी मुदत

पेजर म्हणजे काय?

पेजर हे एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे. या डिवाइसचा उपयोग मॅसेज पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी केला जातो. हे संवादाचे सर्वात विश्वसनीय माध्यम मानले जाते. 1985 ते 1990 या काळात हे उपकरण खूप लोकप्रिय होते. डॉक्टरांपासून ते आपत्कालीन सेवा व्यावसायिकांपर्यंत सर्वांनी या डिवाइसचा मोठ्या प्रमाणात वापर केला. आम्ही तुम्हाला सांगतो की, 1995 च्या दशकात भारतात पेजर्सची ओळख झाली. अनेक कंपन्यांनी पेजर सेवा देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात, व्यवसाय आणि वैद्यक क्षेत्रात पेजरचा सर्वाधिक वापर केला जात असे. परंतु फोनच्या आगमनानंतर या उपकरणाची लोकप्रियता कमी झाली.

पेजर कसे काम करतो?

पेजर रेडिओ फ्रिक्वेन्सीवर काम करतो. मॅसेज पाठवण्यासाठी हे डिव्हाइस ते नेटवर्क पकडते, ज्यावर मॅसेज वितरित करायचा आहे. यासाठी युजरला इंटरनेटची गरज नाही. हे असे डिवाइस आहे, ज्याची बॅटरी लाईफ दीर्घकाळापर्यंत असते. आम्ही तुम्हाला सांगतो की, मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागात या उपकरणाचा सर्वाधिक वापर झाला. तेथील नागरिकांसाठी हे अगदी महत्त्वाचे डिवाइस होते. 

पेजर ब्लास्ट कसे झाले?

मिळालेल्या माहितीनुसार, लेबनॉनमध्ये पेजर बॉम्बस्फोट हिजबुल्लाहचे मजबूत स्थान असलेल्या भागात झाले आहेत. या पेजर्सचा मॉडेल क्रमांक AR-924 असून लेबनॉनमध्ये पोहोचण्यापूर्वी त्यांच्याशी छेडछाड करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले गेले आहे की, पेजरमध्ये स्फोटक घटक बसविण्यात आले होते, ज्याचा विशिष्ट कोड प्राप्त होताच स्फोट झाला. यामागे इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, इस्रायल किंवा त्यांच्या लष्कराकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. 

हिजबुल्ला अजूनही पेजर का वापरतात?

हिजबुल्लाने अनेक वर्षांपासून सुज्ञपणे संवाद साधण्यासाठी पेजरचा वापर केला आहे. मोबाइल फोन, जे अधिक प्रगत आहेत, ते खूप धोकादायक मानले गेले आहेत. उदाहरणार्थ, 1996 मध्ये इस्रायलने हमास बॉम्ब निर्माता याह्या अय्याशला त्याच्या हातात स्फोट करून मारण्यासाठी फोन वापरला. थोडक्यात, हिजबुल्लाहचा पेजरचा वापर  पाळत ठेवणे आणि ट्रॅकिंगचा धोका कमी करण्यासाठी करतात. मात्र, अलीकडील स्फोट असे सूचित करतो की, अगदी कालबाह्य वाटणारे तंत्रज्ञान देखील अत्याधुनिक हल्ल्यांना असुरक्षित असू शकते, ज्यामुळे गटाच्या सुरक्षा पद्धतींबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :