आता ऑनलाईन चित्रपट आणि वेब सिरीज आवडणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅटफॉर्म हजर झाला आहे. त्याचे नाव OTTplay Premium आहे, हे प्लॅटफॉर्म नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एकाच वेळी 12 भारतीय आणि आंतरराष्ट्रीय व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस दिल्या जात आहेत. OTTplay गेल्या वर्षी HT लॅब्स (जी HT मीडियाचा भाग आहे) ने कंटेंट सर्च करण्यासाठी आणि सजेस्ट करण्यासाठी म्हणून सादर केली होती, जी आता स्ट्रीमिंग सर्व्हिसमध्ये रूपांतरित झाली आहे.
सदस्य भाषा-आधारित किंवा विषय-आधारित सब्स्क्रिप्शन बंडलमध्ये निवडू शकतात. यामध्ये, SonyLIV, ZEE5, Lionsgate Play, Sun NXT, ShemarooMe, Curiosity Stream, ShortsTV आणि DocuBay यांसारख्या स्ट्रीमिंग सेवांव्यतिरिक्त, तुम्हाला Hallmark Movies Now, DUST, FUSE+ आणि Tastemade+ या चार आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची सदस्यता देखील दिली जाते. हे आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आतापर्यंत भारतात उपलब्ध नव्हते.
हे सुद्धा वाचा : Realmeच्या 'या' फोनवर पहिल्या सेलमध्ये भारी सूट ! फक्त 1,036 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी
OTTplay सबस्क्रिप्शन iOS आणि Android डिव्हाइसवर, तसेच त्याच्या वेबसाइटवर काम करेल. येथे तुम्हाला 9 भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांसह 18 हून अधिक शैलींमधील 20,000 हून अधिक शोचा आनंद घेता येईल. ग्राहक फक्त एका सबस्क्रिप्शनसह 12 वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवरून त्यांच्या आवडता कंटेंट बघू शकतील. अलीकडेचं युजर सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, ग्राहकांना एक बंडल सब्स्क्रिप्शन आवश्यक आहे, जेथे ते एकाच वेळी वेगवेगळे OTT कंटेंट पाहू शकतात.
लाँच इव्हेंटमध्ये, OTTplay चे संस्थापक अविनाश मुदलियार म्हणाले, "हे एक पहिले प्रोडक्ट आहे. आम्ही क्युरेशन, ऍग्रीगेशन्स, रेकमेंडेशन आणि पर्सनलायझेशनचे विशेषज्ञ आहोत. OTTplay ऍपवर सबस्क्रिप्शन लाँच केल्यामुळे, प्रेक्षकांना काय हवे? हे आम्हाला नीटप्रकरे कळलं आहे. या प्लॅटफॉर्मचा उद्देश ग्राहकांना त्यांच्यासाठी योग्य कंटेंट शोधण्याऐवजी त्यांचा आवडता कंटेंट पाहण्यात वेळ घालवणे हा आहे."
OTTplay Premium वर तुम्हाला 5 प्रकारचे सबस्क्रिप्शन पैक मिळतात. यामध्ये झकास (5 हिंदी OTT), टोटली शॉर्टेड (8 इंग्रजी OTT), सिंपली साऊथ (दक्षिण भारतीय भाषेसह 4 OTT) आणि छोटा पटाका (5 मिक्स OTT) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांची किंमत महिन्याला फक्त 50 रुपयांपासून सुरू होते. वार्षिक पेमेंटसह, तुम्हाला बरीच बचत करता येईल. जे या OTT सदस्यता स्वतंत्रपणे घेण्यापेक्षा खूपच कमी असेल. कंटेंट पाहण्याव्यतिरिक्त युजर्स यावर शोचे रेटिंग, रिव्युज, स्टार इंटरव्ह्यूज आणि OTT शो संबंधित बातम्या देखील पाहू शकतील.