OTT This Week: ‘या’ आठवड्यात सस्पेन्स आणि कॉमेडीचा मिळेल डबल डोस, बघा ‘या’ वेब सिरीज

Updated on 21-Sep-2022
HIGHLIGHTS

या आठवड्यात OTTवर थ्रिलर आणि कॉमेडीचा डबल डोस मिळेल

'हश-हश' वेब सिरीजमधून अभिनेत्री जुही चावला OTTवर पदार्पण करणार

'जामताडा 2' 23 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार

नवीन आठवड्याच्या सुरुवातीसह, प्रत्येकजण OTT वर नवीन कंन्टेन्ट येण्याची वाट पाहू लागतो. OTT चा वाढता ट्रेंड पाहता निर्माते देखील काहीतरी नवीन ऑफर करत राहतात. हा आठवडा मनोरंजनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा  आहे. या आठवड्यात OTT वर येणारे आणि आलेले चित्रपट आणि सिरीज तुम्हाला मनोरंजनाचा भारी डोस देणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या आणि झालेल्या चित्रपट आणि सिरीजबद्दल… 

हे सुद्धा वाचा : Honor कडून मोठ्या डिस्प्ले आणि पावरफुल प्रोसेसर असलेला नवीन टॅबलेट लाँच, जाणून घ्या किंमत

ड्यूड सीजन 2

Amazon Mini TV ची आगामी वेब सिरीज 'Dude Season 2' या आठवड्यात रिलीज झाली आहे. सिरीजच्या पहिल्या सीझनच्या जबरदस्त यशानंतर, आता रस्क मीडियाने ड्यूड सीझन 2 रिलीज केला आहे. सिरीजच्या या भागात तुम्हाला आणखी रोमांच, ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळतील.

हश-हश

OTT च्या जगात, मर्डर मिस्ट्रीवर आधारित आणखी एक नवीन वेब सिरीज दहशत निर्माण करणार आहे. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला आणि आयशा झुल्का या आठवड्यात रिलीज होणाऱ्या 'हश-हश' सिरीजद्वारे OTTच्या जगात पदार्पण करणार आहेत. या सिरीजमध्ये सोहा अली खान आणि कृतिका कामरा देखील दिसणार आहेत. ही सिरीज 22 सप्टेंबरला Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे.

जामताडा 2

Netflix ची लोकप्रिय क्राइम थ्रिलर सिरीज 'जामताडा' या आठवड्यात त्याच्या दुसऱ्या सीझनसह OTT वर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. 'जामताडा'च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अशा परिस्थितीत लोकांना मनोरंजनाचा आणखी एक डोस देण्यासाठी ही सिरीज या आठवड्यात 23 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :