OTT Releases This Week: ‘या’ आठवड्यात OTT वर मिळेल रोमान्स, क्राईम आणि सस्पेन्ससह मनोरंजनाचा भारी डोज, बघा यादी

OTT Releases This Week: ‘या’ आठवड्यात OTT वर मिळेल रोमान्स, क्राईम आणि सस्पेन्ससह मनोरंजनाचा भारी डोज, बघा यादी
HIGHLIGHTS

बायको देता का बायको हा एक विनोदी ड्रामा मराठी चित्रपट आहे.

रणनीती: बालाकोट अँड बियॉंड एक मनोरंजक ॲक्शन थ्रिलर आहे.

अर्जुन रामपाल आणि विद्युत जामवाल यांचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट क्रॅक या आठवड्यात 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

भारतीय तरुणाईमध्ये OTT चे क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एकापेक्षा एक मनोरंजक सामग्री बघायला मिळते. नवनवीन आणि लोकप्रिय चित्रपट, देशी आणि विदेशी वेब सिरीज बघायला मिळतात. आपणा सर्वांना माहितीच आहे की, दर आठवड्याला OTT अनेक नवीन चित्रपट आणि वेब सिरीज अनेक भाषांमध्ये रिलीज होत असतात. त्यामुळे रसिक प्रेक्षकांसाठी हा रिपोर्ट अगदी महत्त्वाचा ठरेल. या आठवड्यात मराठीमध्ये अप्रतिम चित्रपट रिलीज होणार/झाले आहेत. तर, हिंदी शोजमध्ये तुम्हाला बायोग्राफी, गुन्हेगारी, थ्रिलर्सपर्यंत अशा विविध शैलीची सामग्री मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात संपूर्ण यादी-

Aadharwad

YouTube video player

आधारवड हा एक रोमँटिक ड्रामा मराठी चित्रपट आहे. चित्रपटात सयाजी शिंदे, अतुल परचुरे, रोहित हंचाटे यांची प्रमुख भूमिका आहे. समृद्धी शिमगे, शक्ती कपूर, राखी सावंत. आधारवड नयना आणि श्रावण यांच्यातील रोमँटिक बॉन्ड कॅप्चर करते. परंतु कुटुंबांमधील बदलत्या गतीशीलतेवर आणि पालक आणि मुलांमधील मजबूत संबंधांचे पालनपोषण करण्याचे महत्त्व देखील चित्रपटात प्रतिबिंबित केले गेले आहे.

Language and Genre: Marathi, Romantic

Cast: Sayaji Shinde, Atul Parchure, Rohit Hanchate, Rakhi Sawant etc.

OTT Release Date: 23 April 2024

Where to Watch: Amazon Prime Video

Eka Breakup Chi Gosht

YouTube video player

एक ब्रेक अप ची गोष्ट हा देखील एक रोमँटिक ड्रामा मराठी चित्रपट आहे. ज्यात अनुराग दळवी, अदिती परांजे, मनीषा चौहान, अमोल रेडिज आणि सुजाता काळोखे यांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट 23 April 2024 रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला आहे.

Language and Genre: Marathi, Romantic

Cast: Anurag Dalvi, Aditi Paranje, Manisha Chauhan, Amol Redidge and Sujata Kalokhe

OTT Release Date: 23 April 2024

Where to Watch: Amazon Prime Video

Bayko Deta Ka Bayko

YouTube video player

बायको देता का बायको हा एक विनोदी ड्रामा मराठी चित्रपट आहे. यात सुनील गोडबोले, किशोर ढमाले, अभिलाषा पाटील, आरती तांबे, श्वेता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एका अशा माणसाभोवती फिरतो, जो सरकारी नोकरी करत नसल्यामुळे पत्नी शोधण्यासाठी धडपडत करत असतो. हा विनोदी नाटक तरुण पिढीतील जोडीदाराकडून असलेल्या अवास्तव अपेक्षांवर प्रकाश टाकणारा आहे.

Language and Genre: Marathi, Comedy

Cast: Sunil Godbole, Kishore Dhmale, Abhilasha Patil, Aarti Tambe, Shweta Kulkarni

OTT Release Date: 23 April 2024

Where to Watch: Amazon Prime Video

Ranneeti: Balakot & Beyond (25 April)

YouTube video player

रणनीती: बालाकोट अँड बियॉंड एक मनोरंजक ॲक्शन थ्रिलर आहे. ही सिरीज 2019 च्या बालाकोट हवाई हल्ल्यावर आधारित आहे. या सिरीजमध्ये जिमी शेरगिल, आशुतोष राणा आणि लारा दत्ता यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘Ranneeti: Balakot & Beyond’ या आठवड्यात 25 एप्रिल रोजी Jiocinema वर पाहता येईल.

Language and Genre: Hindi, Drama

Cast: Jimmy Shergill, Ashutosh Rana, Lara Dutta

OTT Release Date: 25 April 2024

Where to Watch: Jiocinema

Crakk

YouTube video player

अर्जुन रामपाल आणि विद्युत जामवाल यांचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट क्रॅक या आठवड्यात 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एका मुंबईस्थित स्टंटमॅनवर आधारित आहे, जो आपल्या भावाच्या बेपत्ता होण्याचे सत्य शोधण्यासाठी धोकादायक स्पर्धेत भाग घेतो.

Language and Genre: Hindi, Drama

Cast: Arjun Rampal, Vidyut Jammwal, Nora Fatehi

OTT Release Date: 26 April 2024

Where to Watch: Disney+Hotstar

Dil Dosti Dilemma

YouTube video player

अंदलिब वाजिद यांच्या अस्मारा समर या कादंबरीवर आधारित ‘Dil Dosti Dilemma’ 25 एप्रिलपासून Amazon Prime Video वर पाहता येईल. यात अस्मारा या तरुणीची कहाणी आहे. या सिरीजमध्ये अनुपमा परमेश्वरन, सिद्दू जोनालागड्डा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. जर तुम्हाला मैत्री आणि प्रेमावर आधारित सिरीज बघायची असेल तर ही योग्य सिरीज ठरेल.

Language and Genre: Hindi, Drama

Cast: Anupama Parameswaran, Siddu Jonnalagadda

OTT Release Date: 25 April 2024

Where to Watch: Netflix

Thank You, Goodnight: The Bon Jovi Story

YouTube video player

थँक यू, गुडनाईट ही चार भागांची डॉक्युमेंट्री आहे. ही डॉक्युमेंट्री 26 एप्रिल रोजी Disney + Hotstar वर येत आहे. हा शो बॉन जोवी या पौराणिक रॉक बँडवर आधारित आहे. ही सिरीज बँडच्या आंतरराष्ट्रीय सुपरस्टारडमच्या उदयाची आणि त्याच्या संघर्षाची कथा दर्शवेल.

Language and Genre: English, Documentry

Cast: Anupama Parameswaran, Siddu Jonnalagadda

OTT Release Date: 26 April 2024

Where to Watch: Disney+Hotstar

Goodbye Earth

YouTube video player

गुडबाय अर्थ वूंगचेऑन शहरात राहणाऱ्या लोकांची कथा सांगते. जे अत्यंत अराजकता आणि निराशा असूनही आशेचा शोध घेतात. मार्शल लॉ, सामाजिक संकुचित आणि जगण्याच्या नैतिक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सेट केलेल्या जिन से-क्युंग या माध्यमिक शिक्षकावर कथा केंद्रित आहे. हा शो कोटारो इसाका यांच्या शोमात्सु नो फुरू या कादंबरीवर आधारित आहे.

Language and Genre: Korean, English, Documentry

Cast: Barry Tsavaris, Yoo Ah-in-ahn, Yoon-jin

OTT Release Date: 26 April 2024

Where to Watch: Netflix

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo