OTT Release : या आठवड्यात ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट आणि सिरीज OTT वर होतील रिलीज, बघा यादी

Updated on 17-Nov-2022
HIGHLIGHTS

हा आठवडा प्रेक्षकांसाठी असेल मनोरंजनाने भरपूर

या आठवड्यात OTTवर जबरदस्त वेब सिरीज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत.

सीता रामम हिंदी 18 नोव्हेंबर रोजी OTTवर प्रदर्शित होणार आहे.

सध्या नवीन चित्रपट आणि वेब सिरीज रोज OTT वर स्ट्रीम केले जातात. केवळ भारतीयच नाही तर परदेशी चित्रपट आणि मालिका देखील तुम्हाला OTT वर बघायला मिळतात. या आठवड्यात, गुरुवार आणि शुक्रवार प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा दुहेरी डोस घेऊन येणार आहे. शुक्रवारपर्यंत OTT प्लॅटफॉर्मवर जबरदस्त चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होतील. चला तर मग बघुयात नवीन रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरीज यादी…

हे सुद्धा वाचा : FIFA World Cup पूर्वी Jio ने आणले 5 जबरदस्त प्लॅन, फक्त काही युजर्सना मिळेल लाभ

'द हॉरर सीरिज 1899' सीझन 1

'हॉरर सीरीज 1899' हा चित्रपट 17 नोव्हेंबरला Netflix वर प्रदर्शित होणार आहे. ही सिरीज युरोपियन स्थलांतरितांच्या ग्रुपवर आधारित आहे, जे एका जहाजावर प्रवास करत आहेत. त्यांचे जहाज समुद्रात दुसर्‍या जहाजाशी भिडते, त्यानंतर त्या स्थलांतरित गटाचा प्रवास गोंधळात सुरू होतो. ही सिरीज थ्रिलने भरलेली आहे. 

सीता रामम हिंदी

मृणाल ठाकूर आणि दुलकर सलमान यांच्या 'सीता रामम' या चित्रपटाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता हा चित्रपट हिंदीत OTT प्लॅटफॉर्म 'Disney Plus Hotstar' वर शुक्रवार, 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

कंट्री माफिया

दिग्दर्शक शशांक राय यांची थ्रिलर वेब सिरीज 'कंट्री माफिया' 18 नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रसारित होणार आहे. यामध्ये रवी किशन, सौंदर्या शर्मा, अंशुमन पुष्कर, अनिता राज आणि सतीश कौशिक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'डेड टू मी' सीझन 3

जर तुम्हाला हॉररची आवड असेल, तर 'डेड टू मी'चा तिसरा सीझन 17 नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. ही एक ब्लॅक कॉमेडी सिरीज आहे. त्याचा पहिला सीझन 2019 मध्ये आणि दुसरा सीझन 2020 मध्ये रिलीज झाला होता. हे दोन्ही सीझन प्रेक्षकांना खूप आवडले.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :