digit zero1 awards

विकेंडला OTTवर ‘या’ वेब सिरीजचा आनंद घ्या, फक्त बोल्ड सीनचं नाही तर कंटेंटही जबरदस्त

विकेंडला OTTवर ‘या’ वेब सिरीजचा आनंद घ्या, फक्त बोल्ड सीनचं नाही तर कंटेंटही जबरदस्त
HIGHLIGHTS

विकेंडला OTTवर या बोल्ड सिरीज बघा

नेटफ्लिक्स, हॉटस्टार इ. वर सिरीज उपलब्ध

Disney + Hotstar वर 'सिक्स' सिरीज उपलब्ध आहे.

आजकाल चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये खूप बोल्ड कंटेंट पाहायला मिळतो. अनेक वेळा वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेली ही दृश्ये प्रेक्षकांना आकर्षित करतात, परंतु कथा काही खास नसते. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही सिरीजबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये खूप बोल्डनेससोबतच कंटेंटही खूप चांगला आहे. 

हे सुद्धा वाचा : सरड्यासारखं नाही पण रंग बदलणारा Vivo स्मार्टफोन भारतात लाँच, किंमतही कमी

सिक्स

या सिरीजमध्ये महिलांची असहायता अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. मर्डर मिस्ट्रीवर आधारित ही वेब सिरीज वैश्या ते प्रेम आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखवते. तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल अशी या सिरीजची कथा आहे. Disney + Hotstar वर ही सिरीज तुम्ही पाहू शकता.

Metoo

बॉलिवूड अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या एका मुलीची कथा या सिरीजमध्ये दाखवण्यात आली आहे. पण तिला इंडस्ट्रीत खूप त्रास सहन करावा लागतो. हळूहळू कथेत ट्विस्ट येतो, ज्यामुळे मजा येते. यासोबतच या सिरीजमध्ये भरपूर बोल्ड सीन्स आहेत. तुम्ही ही सिरीज उल्लू ऍपवर पाहू शकता.

शी 

ही कथा आहे एका मस्त दिसणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलची, जी ड्रग्सच्या माफियांना पकडण्यासाठी वेश्या बनते. हळूहळू ती स्वतःच माफियांच्या जाळ्यात अडकते आणि शेवटी कथेला वेगळे वळण लागते. सिरीजमध्ये बोल्डनेससोबतच उत्तम अभिनय आणि कथाही पाहायला मिळते. ही सिरीज Netflix वर उपलब्ध आहे.

हलाला

या मालिकेची कथा मुस्लिम महिलांवर आधारित आहे. यामध्ये दोन विवाहित जोडप्यांची कथा सुरू होते, जे आधी वेगळे होतात आणि नंतर पुन्हा एकत्र येतात. पण हलालासारखी परंपरा पुन्हा भेटण्यासाठी अडथळा ठरते. ही सिरीज उल्लू ऍपवर उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo