प्रत्येक दुसऱ्या मोबाईल युजरसाठी WhatsApp हे महत्त्वाचे आणि सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ऍप आहे. आपल्या युजर्ससाठी WhatsApp नेहमीच नवनवे फीचर्स आणत असतो. या इन्स्टंट मेसेजिंग ऍपमध्ये आपण ग्रुपमध्ये किंवा व्यक्तिगत चॅट करू शकतो. त्याबरोबरच यामध्ये व्हीडिओ कॉलिंगची देखील सुविधा आहे. बऱ्याच सोयी-सुविधानंतर आता WhatsApp ऑनलाईन पेमेंटसाठी देखील वापरले जाऊ लागले आहे. WhatsAppने युजर्ससाठी ऑनलाईन पेमेंटची देखील सुविधा आणली आहे. त्याबरोबरच याद्वारे तुम्हाला पैसेदेखील कमवता येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे पैसे तुम्हाला कॅशबॅकच्या स्वरूपात मिळणार आहेत.
या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट केल्यानंतर 35 रुपायांचा कॅशबॅक मिळणार आहे. मात्र, यासाठी कंपनीने काही अटी देखील लागू केल्या आहेत. त्यामुळे ही ऑफर प्रत्येक युजर्ससाठी प्रत्येक व्यवहारांवर लागू नसेल.WhatsApp पेमेंटचा पर्याय वापरून पहिल्याच व्यवहारानंतर तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे. या ऑफरचा लाभ युजर्सना तीन वेळा वेगवेगळ्या पेमेंट ट्रान्सफरवर घेता येणार आहे. चला तर जाणून घेऊयात कॅशबॅक मिळवण्यासाठी युजर्सना कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील.
हे सुद्धा वाचा: 8GB RAM आणि 50MP कॅमेरासह Motorola स्मार्टफोनची लवकरच भारतात एन्ट्री, बघा फीचर्स
ही कॅशबॅक ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. सर्वप्रथम या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमचे व्हॉट्सऍप पेमेंट अकाउंट तीस दिवसांपूर्वी वापरण्यास सुरु केलेले असणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स व्हॉट्सऍपशी लिंक करावे लागतील. त्याबरोबरच, ज्या व्यक्तीला तुम्हाला पेमेंट करायचे आहे, ती व्यक्तीदेखील साहजिकच व्हॉट्सऍपवर असणे आवश्यक आहे. एकूणच या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमचे आणि ज्या व्यक्तीला पेमेंट पाठवायचे आहे, त्यांचे व्हॉट्सऍप पेमेंट अकाउंट ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे.
लोकप्रिय मेसेजिंग ऍपची कॅशबॅक ऑफर वेगवेगळ्या युजर्ससाठी वेगवेगळ्या वेळी उपलब्ध असणार आहे. जेव्हा तुम्हाला कॅशबॅक ऑफर उपलब्ध असेल, तेव्हाच या ऑफरचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. याचप्रमाणे, ज्यांना पेमेंट पाठवायचे आहे, त्यांनादेखील ही सुविधा त्याचवेळी उपलब्ध असल्यास तुम्हाला कॅशबॅकचा लाभ मिळणार आहे. कोणत्याही व्हॉट्सऍप युजरला पैसे ट्रान्सफर करून तुम्हाला 35 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. विशेषतः या ऑफरसाठी किमान रकमेची काही मर्यादा नाही. मात्र, यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या तीन पेमेंट वापरणाऱ्या युजर्सना तीन वेगवेगळे पेमेंट करावे लागेल. यात एका युजरला पेमेंट केल्यास तुम्हाला फक्त एकदाच कॅशबॅक मिळणार आहे.