चीनी स्मार्टफोन ब्रँड Oppo ने आपले नवीन उपकरण Oppo Pad Air भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. Oppo 18 जुलै रोजी हा टॅबलेट लाँच करणार आहे. Oppo कडून येणारा हा नवीन टॅबलेट असेल. 18 जुलै रोजी, Oppo Oppo Enco X2 TWS earbuds आणि Oppo Reno 8 स्मार्टफोन सिरीज देखील लाँच करेल. हे दोन्ही उपकरण गेल्या वर्षी मे महिन्यातच देशांतर्गत बाजारात लाँच करण्यात आले होते.
हे सुद्धा वाचा : सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन! अतिशय कमी किमतीत मिळेल दररोज 3GB डेटा, मोफत कॉलिंग आणि SMS चा लाभ
हा टॅबलेट 10.36 इंच डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह येईल. Oppo चा हा लाँच इव्हेंट भारतात 18 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. चला जाणून घेऊया Oppo Pad Air चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स…
Oppo Pad Air टॅबलेट Android 12 आधारित ColorOS वर चालेल. या टॅबलेटमध्ये 10.36-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, जो 2,000×1,200 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. ओप्पो पॅड एअर ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि 4 GB LPDDR4x रॅमसह येतो. त्याची रॅम 7 GB (4 GB + 3 GB) पर्यंत वाढवता येते. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर, ते मायक्रो SD कार्डद्वारे 512 GB पर्यंत वाढवता येते. टॅब्लेटमध्ये क्वाड स्पीकर्स आहेत, जे डॉल्बी ATMOS ला सपोर्ट करतात.
ओप्पो पॅड एअर टॅबलेट 8-मेगापिक्सलचा मागील कॅमेरा सेन्सरसह येईल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, या टॅबलेटमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा असेल. या टॅबलेटला 7,100mAh बॅटरीचा पाठिंबा आहे, जो 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. या टॅबमध्ये तुम्हाला मल्टी डिवाइस कनेक्शन, टू- फिंगर स्प्लिट स्क्रीन यांसारखे फीचर्स बघायला मिळतील. हा टॅब Android 12 वर आधारित ColorOS सह लाँच होऊ शकतो.
कंपंनीचे नवीन इयरबड्स ओप्पो पॅड एअर सह लाँच केले जाणार आहेत. हे बड्स ऍक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फिचरसह सादर करण्यात येतील.