Oppo ने मंगळवारी आपला नवीन टॅबलेट Oppo Pad 2 लाँच केला आहे. हा टॅबलेट दमदार फीचर्सने सुसज्ज आहे. Oppo Pad 2 मध्ये MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर आणि 12 GB पर्यंत RAM समर्थित आहे. Oppo Pad 2 मध्ये 67W सुपर फ्लॅश चार्ज सपोर्ट देखील आहे. चला तर बघुयात किंमत आणि फीचर्स
हे सुद्धा वाचा : Jio True 5G: महाराष्ट्रातील नवीन दोन शहरांमध्ये सेवा लाँच, तुमचे शहर आहे का यादीत?
Oppo ने सध्या देशांतर्गत बाजारात आपला टॅबलेट सादर केला आहे. हा टॅबलेट फेदर गोल्ड आणि नेब्युला ग्रे कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. Oppo Pad 2 तीन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. त्याच्या 8GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 2,999 म्हणजेच अंदाजे रु. 36,100, 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 3,399 म्हणजेच अंदाजे रु. 40,900 आहे. सध्या कंपनीने भारतात लॉन्च करण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
Oppo Pad 2 11.61-इंच 2.8K LCD स्क्रीनसह सुसज्ज आहे, जो 1800 x 2880 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. टॅबलेट MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर आणि 12GB पर्यंत LPDDR5 रॅमसह येतो. टॅबलेटमध्ये 512 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज उपलब्ध आहे, जे वाढवता येत नाही. यासोबत Android 13 आधारित ColorOS उपलब्ध आहे.
Oppo Pad 2 वरील मागील कॅमेरा 80-डिग्री फील्ड-ऑफ-व्ह्यू आणि f/2.2 अपर्चर लेन्ससह 13-मेगापिक्सेल कॅमेरासह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8-मेगापिक्सेल फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. Oppo Pad 2 मध्ये 9,510mAh बॅटरी आणि 67W चार्जिंग सपोर्ट आहे. टॅबमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3 आणि USB टाइप-C पोर्ट उपलब्ध आहेत.