OpenAI o1: नवीनतम AI मॉडेल लाँच! ChatGPT पेक्षा कमी दरात उपलब्ध, ‘अशा’प्रकारे करेल काम 

OpenAI o1: नवीनतम AI मॉडेल लाँच! ChatGPT पेक्षा कमी दरात उपलब्ध, ‘अशा’प्रकारे करेल काम 
HIGHLIGHTS

OpenAI o1 नावाचे एक नवीन मॉडेल लाँच केले गेले आहे.

नुकतेच म्हणजे 12 सप्टेंबर रोजी कंपनीने पूर्णपणे नवीन AI मॉडेलचे अनावरण केले.

OpenAI च्या मते, नवा मॉडेल जटिल कार्यांद्वारे तर्क करू शकतो.

OpenAI o1 नावाचे एक नवीन मॉडेल लाँच करण्यात आले आहे. गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी कंपनीने पूर्णपणे नवीन AI मॉडेलचे अनावरण केले. नवीनतम AI मॉडेल प्रतिसाद देण्यापूर्वी विचार करते, असे सांगितले गेले आहे. OpenAI च्या मते, मॉडेल जटिल कार्यांद्वारे तर्क करू शकतो आणि मागील मॉडेलपेक्षा विज्ञान, कोडिंग आणि गणितातील अधिक कठीण प्रश्न सोडवण्याची क्षमता ठेवतो. हे o1-mini सोबत रिलीझ केले जात आहे, म्हणजेच एक लहान आणि स्वस्त आवृत्ती होय. ‘

Also Read: Myntra वर अप्रतिम डील्स आणि सवलतींसह मिळतायेत भारी Earbuds आणि Smartwatches, पहा ऑफर्स

OpenAI o1 म्हणजे काय?

OpenAI चा o1 मॉडेल मानवासारखे AI प्राप्त करण्याच्या दिशेने एक उत्तम पाऊल आहे, असे सांगण्यात आले आहे. मॉडेल मागील पिढीपेक्षा अधिक कार्यक्षमतेने कोड तयार करणे आणि जटिल, बहु-चरण आव्हाने हाताळणे यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ठोस सुधारणा देखील दर्शवतो. OpenAI ने या रिलीजमध्ये म्हटले की, त्यांनी या मॉडेल्सना प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी विचार करण्यासाठी अधिक वेळ घालवण्यासाठी माणसाप्रमाणे प्रशिक्षण दिले आहे. मॉडेलची विचार प्रक्रिया सुधारण्यास, विविध रणनीती वापरण्यास आणि त्यांच्या चुका ओळखण्यास शिकवले आहे.

OpenAI o1 mini

कंपनीने सांगितले की, o1 सिरीज कॉम्प्लेक्स कोड अचूकपणे जनरेट करण्यात आणि डीबग करण्यात उत्कृष्ट आहे. डेव्हलपर्सना अधिक कार्यक्षम उपाय प्रदान करण्यासाठी, OpenAI ने OpenAI o1-mini, एक जलद आणि अधिक परवडणारे तर्क मॉडेल देखील जारी केले आहे, जे कोडिंगसाठी विशेषतः प्रभावी आहे. एक छोटे मॉडेल असल्यामुळे o1-mini हे o1-preview पेक्षा 80% स्वस्त आहे. ज्यामुळे ते ऍप्लिकेशन्ससाठी एक पॉवरफुल आणि परवडणारे मॉडेल बनते. आजपासून, ChatGPT Plus आणि टीम वापरकर्ते ChatGPT मध्ये o1 मॉडेल वापरण्यास सक्षम असतील. o1 प्रिव्ह्यू आणि o1-mini हे मॉडेल पिकरमधून मॅन्युअली निवडले जाऊ शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन o1 मॉडेलमध्ये काही वैशिष्ट्ये गहाळ आहेत. जी ChatGPT 4o मॉडेलमध्ये दिसू शकतात, अशी OpenAI ने पुष्टी केली आहे. प्रारंभिक मॉडेल म्हणून त्यात माहितीसाठी वेब ब्राउझिंग आणि फाइल्स आणि इमेज अपलोड करणे इ. फीचर्स उपलब्ध नाहीत. म्हणजेच आत्तासाठी हे मॉडेल फक्त टेक्स्ट प्रॉम्प्ट घेण्यास सक्षम आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo