घरबसल्या ऑनलाईन Aadhaar कार्ड मोफत अपडेट करण्याच्या योजनेला भारतीयांच्या भरभरून प्रतिसाद मिळत आहे. Aadhaar कार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख आज म्हणजेच 14 जून 2024 होती. मात्र, नागरिकांना आणखी एकदा दिलासा सरकारने आधार कार्ड मोफत अपडेटची अंतिम मुदत वाढवली आहे. होय, या योजनेची मुदत आणखी वाढवण्यात आली आहे. बघुयात सविस्तर माहिती-
Also Read: Google Pixel 8 वर मिळतोय थेट हजारो रुपयांचा Discount! फ्लॅगशिप फोनवर आतापर्यंतची Best ऑफर
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड तपशील विनामूल्य अपडेट करण्यासाठी अंतिम मुदतीसाठी आणखी एक विस्तार जाहीर केला आहे. UIDAI नुसार, UID धारकांना 14 सप्टेंबरपर्यंत त्यांचे आधार कार्ड अपडेट पूर्ण करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. MyAadhaar पोर्टलवर आधार कार्ड अपडेट मोफत करता येईल. मात्र, ऑफलाइन अपडेटसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, पूर्वी या योजनेसाठी 15 डिसेंबर 2023 ही अंतिम तारीख होती. मात्र, पुढे या योजनेची अंतिम मुदत वाढत गेली. होय, त्यानंतर 14 मार्च, नंतर 14 जून आणि आता 14 सप्टेंबरपर्यंत अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
वरील सोपी प्रक्रिया फॉलो करून तुम्ही मोफतमध्ये Aadhaar अपडेटची विनंती करू शकता. यासह तुम्हाला नवा अपडेटेड आधार कार्ड लवकरच मिळेल.