सध्या Aadhar कार्ड तुमच्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. सर्व महत्त्वाच्या कामांसाठी किंवा तुमचे ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा उपयोग होतो. मात्र, जर तुमचे आधार कार्ड 10 वर्ष जुने असेल आणि आता पर्यंत तुम्ही हे कार्ड अपडेट केले नसेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता 10 वर्ष जुने असलेल्या आधार कार्डला अपडेट करणे बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.
तुमचे आधार 10 वर्षे जुने असल्यास, तुम्ही 14 जूनपूर्वी तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता. UIDAI ने 15 मार्च ते 14 जून या कालावधीत आधार ऑनलाइन अपडेट मोफत केले होते. 14 जूननंतर आधार अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. सरकारने 14 जूनपर्यंत ऑनलाइन आधार अपडेटसाठी शुल्क माफ केले आहे.
– सर्वप्रथम, तुम्ही आधारच्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
– येथे वर myAadhaar पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
– यानंतर तुम्हाला 'अपडेट आधार' पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
– आता युजरला आधार नंबर आणि सिक्योरिटी कोड द्यावा लागेल.
– यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर OTP पाठवला जाईल. यासह तुमचा नंबर व्हेरिफाय केला जाईल.
– यानंतर तुम्हाला तुमचं बद्दल बेसिक माहिती द्यावी लागेल. जसे की, पत्ता, जन्मतारीख, नाव इ.
– या माहितीचे प्रमाणीकरण करण्यासाठी काही कागदपत्रांच्या फोटो कॉपी अपलोड करावे लागतील. आता तुम्हाला कन्फर्म आणि सबमिट बटणवर क्लिक करावे लागेल.