आजपासून OnePlus पॅडची प्री-ऑर्डर सुरु, डिस्काउंट आणि ऑफर्स पहा
OnePlus पॅडची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये
आज दुपारी 12 वाजतापासून प्री-ऑर्डर सुरु
डिव्हाइसची खुली विक्री 2 मे 2023 दुपारी 12 वाजता सुरू होणार
OnePlus ने अलीकडेच आपला पहिला फ्लॅगशिप टॅबलेट OnePlus Pad लाँच केला आहे. फ्लॅगशिप OnePlus पॅडची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये आहे. इच्छुक ग्राहक OnePlus Pad 28 एप्रिलपासून म्हणजेच आज दुपारी 12 वाजतापासून प्री-ऑर्डर करू शकतात. डिव्हाइसला 11.61-इंच लांबीचा 144Hz रीड-फिट डिस्प्ले मिळत आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे.
फ्लॅगशिप टॅबलेट OnePlus कम्युनिटीमध्ये OnePlus एक्सपेरियन्स स्टोअरमध्ये 1 मे पासून मर्यादित स्टॉकमध्ये विक्रीसाठी जाणार आहे. मात्र, डिव्हाइसची खुली विक्री 2 मे 2023 दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.
OnePlus Pad ची उपलब्धता
OnePlus पॅड Amazon.in, Flipkart.com, OnePlus.in, OnePlus Store आणि ऑफलाइन OnePlus एक्सपेरियन्स स्टोअर्स, निवडक रिलायन्स आणि क्रोमा स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे.
बँक ऑफर्समध्ये ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट किंवा कार्ड किंवा EMI सह OnePlus पॅड खरेदी करा आणि 2000 रुपयांची झटपट सूट मिळवा. याव्यतिरिक्त, ग्राहक 12 महिन्यांसाठी 3,166 रुपयांपासून सुरू होणाऱ्या नो कॉस्ट EMIवर देखील खरेदी करू शकतात. या ऑफर्ससह या डिवाइसची प्री-ऑर्डर सुरु झाली आहे.
OnePlus Xchange कार्यक्रमांतर्गत, ग्राहकांनी जुना OnePlus स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास 5,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते किंवा निवडक स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर 3,000 रुपयांपर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile