प्री-बुकिंग आधीच OnePlus Pad ची किंमत जाहीर, तुमच्या बजेटमध्ये आहे का?

Updated on 25-Apr-2023
HIGHLIGHTS

OnePlus ब्रँडचा हा नवीन टॅबलेट दोन प्रकारात मिळेल.

प्री ऑर्डर बुकिंग OnePlus.in वर 28 एप्रिलपासून सुरू होईल.

यावर बरेच बँक ऑफर्स उपलब्ध असतील.

प्रसिद्ध हँडसेट निर्माता OnePlus ने त्यांच्या पहिल्या टॅबलेट OnePlus Pad ची किंमत जाहीर केली आहे. तुम्हाला नवीन टॅबलेट खरेदी करायचा असेल तर कंपनीच्या या टॅबलेट बद्दल विचार करू शकता. तुम्हाला OnePlus ब्रँडचा हा नवीन टॅबलेट दोन प्रकारात मिळेल. बघुयात सविस्तर माहिती – 

OnePlus Pad ची अपेक्षित किंमत

OnePlus च्या या लेटेस्ट टॅबलेटची किंमत कंपनीच्या अधिकृत साइटवरून समोर आली आहे. OnePlus Pad कंपनीच्या अधिकृत साइटवर लिस्ट करण्यात आला होता. आता यासोबत किमतीचा देखील खुलासा करण्यात आला आहे. हा डिवाइस 37,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह खरेदी केला जाऊ शकतो. 

संभावित स्टोरेज मॉडेल्स

वरील किंमत पॅडच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची आहे, असे म्हटले जाते. तर, या पॅडच्या दुसऱ्या वेरिएंटमध्ये तुम्हाला 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.

प्री ऑर्डर बुकिंग

OnePlus टॅबची प्री-ऑर्डर बुकिंग ग्राहकांसाठी कंपनीच्या अधिकृत साइट OnePlus.in वर 28 एप्रिलपासून सुरू होईल. हा टॅब कंपनीच्या अधिकृत साइट आणि इतर ई-कॉमर्स साइटवरून हॅलो ग्रीन कलरमध्ये खरेदी करता येईल. वनप्लसच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, ICICI बँक क्रेडिट कार्ड, EMI आणि नेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यास 2 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंट मिळणार आहे. 

याशिवाय, HDFC, Axis, ICICI सिटी आणि वन कार्ड बँकेच्या कार्डवर 12 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI ची सुविधाही दिली जाईल. OnePlus पॅड ई-कॉमर्स साइट Amazon वरून देखील खरेदी करता येईल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :