OnePlus Pad भारतात लवकरच होणार लाँच, काय मिळेल विशेष ?

OnePlus Pad भारतात लवकरच होणार लाँच, काय मिळेल विशेष ?
HIGHLIGHTS

OnePlus भारतातील ग्राहकांमध्ये लोकप्रिय ब्रँड

OnePlus Pad लवकरच भारतात लाँच होणार

OnePlus Pad ची विक्री भारतात संभवतः 28 एप्रिलपासून सुरु होणार

 OnePlus भारतातील ग्राहकांमध्ये एक लोकप्रिय ब्रँड आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन उपकरणे लाँच करत असते. OnePlus Pad लवकरच भारतात लाँच होणार आहे. या पॅडची पहिली झलक फेब्रुवारीमध्ये झालेल्या कंपनीच्या क्लाऊड 11 इव्हेंटमध्ये बघायला मिळेल. मात्र, कंपनीने याचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबाबत काहीही माहिती दिलेली नव्हती. याबाबत आता संभावित माहिती पूढे आलेली आहे.

संभावित किंमत आणि उपलब्धता 

OnePlus Pad ची किंमत 39,999 रुपये असेल, असे सांगण्यात येत आहे. यासोबत, बरेच बँक ऑफर्स आणि इतर ऑफर्स मिळणार आहेत. OnePlus Pad ची विक्री भारतात संभवतः 28 एप्रिलपासून सुरु होणार आहे.

संभावित स्पेसिफिकेशन्स 

 OnePlus Pad मध्ये 11.61 इंच लांबीचा LCD डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे, त्यासोबतच डायनॅमिक रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत मिळेल. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज प्रकार मिळण्याची शक्यता आहे. या टॅबमध्ये अँड्रॉइड 13 मिळेल. यासह, 5G सेल्युलर शेअरिंगदेखील मिळू शकते. 

डिस्प्लेसह डॉल्बी व्हिजन आणि HDR सपोर्ट देखील मिळेल. तसेच,  OnePlus Pad मध्ये 13MP चा रियर कॅमेरा मिळेल, त्यासोबत इलेकट्रोनिक इमेज स्टॅबलायझेशन मिळू शकते. तर, आकर्षक सेल्फीसाठी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 8MPचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

अशाप्रकारे वरील सर्व संभावित फीचर्ससह OnePlus Pad लाँच होण्याची शक्यता आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo