OnePlus त्याचा OnePlus 11, OnePlus 11R, OnePlus Buds Pro आणि नवीन स्मार्ट टीव्ही 7 फेब्रुवारी रोजी क्लाउड 11 इव्हेंटमध्ये लॉन्च करेल. चीनी टेक्नॉलॉजी कंपनीने आपला आगामी पहिला Android टॅबलेट देशात लाँच करणार असल्याची पुष्टी केली आहे.
हे सुद्धा वाचा : iPhone लव्हर्स ! Flipkartची अप्रतिम ऑफर्स, स्वस्तात खरेदी करा नवीन iPhone
अलीकडेच, OnePlus ने पुष्टी केली आहे की, कंपनी 07 फेब्रुवारी 2023 रोजी भारतात आपला पहिला Android टॅबलेट Cloud 11 कार्यक्रमात इतर अनेक उत्पादनांसह लॉन्च करणार आहे. चीनी तंत्रज्ञान कंपनीने त्याच्या आगामी टॅब्लेटची इमेज टीज केली आहे, जी त्याच्या सिंगल लेन्सच्या मागील कॅमेराबद्दल माहिती दर्शवते…
TechRadar ने अहवाल दिल्याप्रमाणे, OnePlus पॅडची कथित इमेज हॅलो ग्रीन रंगात टॅबलेट दाखवते. हा टॅबलेट इतर रंगांमध्येही येण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, वनप्लस पॅड ऍल्युमिनियम अलॉय बॉडी आणि कॅम्बर्ड फ्रेमचा बनलेला असेल. टॅब्लेटच्या डिझाइनबद्दल दावा कंपनीने केला आहे की, वापरकर्त्यांना हातात टॅबलेट दीर्घकाळ धरून ठेवण्यास सोयीस्कर असेल. OnePlus टॅबलेटमध्ये मध्यवर्ती सिंगल-लेन्स कॅमेरा रियर कॅमेरा सेटअपची असण्याची शक्यता आहे. OnePlus लोगो लेन्सच्या खाली असेल.
7 फेब्रुवारी रोजी कंपनी OnePlus 11, OnePlus 11R, OnePlus Buds Pro 2, OnePlus TV 65 Q2 Pro आणि कीबोर्ड लाँच करेल. OnePlus TV 65 Q2 Pro हा कंपनीचा दुसऱ्या पिढीचा 65-इंचाचा फ्लॅगशिप स्मार्ट टीव्ही आहे. यात QLED डिस्प्ले तंत्रज्ञान मिळेल. OnePlus मधील हा Q मालिका स्मार्ट टीव्ही चांगल्या ऑडिओ गुणवत्तेसह येईल. उत्तम टीव्ही एक्सपेरियन्ससाठी TV डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी ATMOS द्वारे समर्थित असेल.
OnePlus Buds Pro 2 हा प्रीमियम इन-इयर TWS स्टाइल इअरफोन असेल. बड्स प्रो 2 मध्ये डायनॉडिओ ट्यूनिंग फिचर असेल आणि दीर्घ बॅटरी लाईफ देखील मिळेल.