OnePlus Pad Go अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. या टॅबलेटची सेल आज 20 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. हा कंपनीचा बजेट टॅब आहे, जो या महिन्याच्या सुरुवातीला लाँच झाला होता. हा सेल दुपारी 12 वाजल्यापासून OnePlus India, Amazon India आणि Flipkart वर उपलब्ध होईल. तसेच, पहिल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन थेट डिस्काउंटसह मिळणार आहे. चला तर मग टॅबची किंमत, उपलब्धता, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात.
टॅबच्या WiFi 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. यात LTE 8GB + 256GB व्हेरिएंट देखील आहे, ज्याची किंमत 23,999 रुपये आहे. सेल ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, ICICI, SBI आणि One Card कार्डद्वारे टॅब खरेदी केल्यास 2,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट दिली जात आहे.
OnePlus Pad Go मध्ये 11.35 इंच लांबीचा LTPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz आहे. याशिवाय, टॅब MediaTek Helio G99 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. टॅबमध्ये तुम्हाला 8GB LPDDR4X रॅम आणि 128GB आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज मिळणार आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी यात मायक्रो SD कार्ड स्लॉट देखील आहे. ऑडिओसाठी, यात क्वाड स्पीकर सेटसह डॉल्बी ATMOS सपोर्ट आहे.
तसेच, फोटोग्राफीसाठी यात 8MP बॅक आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. टॅबची बॅटरी 8000mAh आहे, ज्यामध्ये 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल. तसेच, टॅबमध्ये चार्जिंगसाठी USB टाइप-सी पोर्ट आहे. हा टॅब Android 13 आधारित OxygenOS 13.2 वर काम करतो.