Price Drop! लोकप्रिय OnePlus Pad Go च्या किमतीत तब्बल 5000 रुपयांची घसरण, पहा ऑफर्स
OnePlus Pad Go भारतातील लोकप्रिय टॅबलेट्सपैकी एक आहे.
तुम्हाला हा OnePlus Pad Go तब्बल 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह मिळेल.
OnePlus Pad Go मध्ये 11.35-इंच लांबीचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.
फ्लॅगशिप किलर म्हणून OnePlus ने भारतात OnePlus Pad Go टॅबलेट लाँच केला होता. हा टॅबलेट सध्या लोकप्रिय टॅबलेट्सच्या यादीत सामील आहे. जर तुम्ही देखील हा टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला OnePlus Pad Go वरील उपलब्ध आकर्षक डीलबद्दल सांगणार आहोत. सध्या ई-कॉमर्स साइट Flipkart वर OnePlus Pad Go वर किमतीत कपातीसह बंपर बँक ऑफर देत आहे. जाणून घेऊयात सविस्तर-
Also Read: अगदी स्वस्तात खरेदी करा जबरदस्त iQOO स्मार्टफोन्स, Amazon वर सेल लाईव्ह! पहा Best ऑफर्स
OnePlus Pad Go ची किंमत आणि ऑफर
OnePlus Pad Go चे (Wi-Fi) 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart वर 16,999 रुपयांना सूचीबद्ध केले गेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा टॅबलेट 19,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला HDFC बँक पिक्सेल क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटवर 2000 पर्यंत सूट मिळेल. अशाप्रकारे तुम्हाला हा टॅबलेट तब्बल 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह मिळेल.
एवढेच नाही तर, एक्सचेंज ऑफरमध्ये या टॅबलेटवर तुम्ही तब्बल 10,000 रुपयांची बचत करू शकता. मात्र, लक्षात घ्या की, एक्सचेंज ऑफरचा जास्तीत जास्त तुमच्या जुन्या किंवा विद्यमान डिवाइसच्या सध्याच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असतो. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा!
OnePlus Pad Go चे तपशील
OnePlus Pad Go मध्ये 11.35-इंच लांबीचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा टॅबलेट MediaTek Helio G99 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी टॅबलेटमध्ये इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजेच EIS सपोर्टसह 8MP चा रियर कॅमेरा आणि समोर 8MP सेल्फी कॅमेरा आहे. तसेच, पॉवर बॅकअपसाठी या टॅबलेटमध्ये 33W SUPERVOOC चार्जिंगसह 8,000mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile