Price Cut! लोकप्रिय OnePlus Pad Go च्या किमतीत 2000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवी किंमत 

Price Cut! लोकप्रिय OnePlus Pad Go च्या किमतीत 2000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवी किंमत 
HIGHLIGHTS

OnePlus Pad Go च्या किमतीत 2000 रुपयांची घट

OnePlus Pad Go कंपनीचा एंट्री लेव्हल टॅबलेट आहे, जो आता आणखी स्वस्तात मिळेल.

OnePlus Pad Go भारतीय बाजारात तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

फ्लॅगशिप किलर OnePlus कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये OnePlus Pad Go लाँच केले होते. मात्र, लाँचच्या काही कालावधीनंतर कंपनीने आता या टॅबच्या किमतीत कपात केली आहे. होय, हा कंपनीचा एंट्री लेव्हल टॅब असला तरी आता कंपनीने या टॅबची किंमत आणखी कमी केली आहे. OnePlus Pad Go मध्ये तुम्हाला तीन 8GB + 128GB Wi-Fi, 8GB + 128GB LTE आणि 8GB + 256GB LTE व्हेरिएंट मिळतात. जाणून घेऊयात या OnePlus टॅबची नवी किंमत-

Also Read: Amazon Great Freedom Festival 2024 प्राइम मेंबर्ससाठी सुरू, लेटेस्ट स्मार्टफोन्सवर होतोय ऑफर्सचा वर्षाव

OnePlus Pad Go ची नवी किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, OnePlus कंपनीने मागील वर्षी OnePlus Pad Go तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केले होते. त्यामध्ये 8GB+128GB Wi-Fi ची किंमत 19,999 रुपये होती. तर, 8GB + 128GB LTE मॉडेलची किंमत 21,999 रुपये आणि तिसऱ्या 8GB + 256GB LTE ची किंमत 23,999 रुपये इतकी आहे. तर, आता या टॅबलेटवर 2000 रुपयांची कपात नोंदवण्यात आली आहे.

ONEPLUS PAD GO

कपातीनंतर, तुम्ही 8GB + 128GB वाय-फाय व्हेरिएंट 17,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर, 8GB + 128GB LTE 19,999 रुपयांमध्ये आणि 8GB + 256GB LTE व्हेरिएंट 21,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. लक्षात घ्या की, या टॅबची नवीन किंमत कंपनीच्या साइटवर लिस्ट करण्यात आली आहे.

OnePlus Pad Go चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus Tab मध्ये 11.35 इंच लांबीचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा टॅब MediaTek Helio G99 प्रोसेसरने सुसज्ज करण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये तुम्हाला 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज मिळेल. त्याबरोबरच, ऑडिओसाठी OnePlus Pad Go मध्ये डॉल्बी ATMOS क्वाड स्पीकर प्रदान केले गेले आहेत.

फोटोग्राफीसाठी, या टॅबमध्ये 8MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यासोबत इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) सपोर्ट मिळेल. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी, या टॅबची बॅटरी 8000mAh इतकी आहे, ज्यामध्ये तुम्हाला 33W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी, यात Wi-Fi, ब्लूटूथ 5.2 आणि USB टाइप-C पोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo