OnePlus Pad GO प्री-ऑर्डर आजपासून सुरू, 2000 रुपयांच्या सवलतीसह Free मिळेल कव्हर। Tech News

Updated on 12-Oct-2023
HIGHLIGHTS

OnePlus Pad GO टॅबलेटची प्री-ऑर्डर आज 12 ऑक्टोबरपासून सुरू

प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना 1,399 रुपये किमतीचे वनप्लस पॅड गो फोलिओ कव्हरही मोफत मिळेल.

OnePlus Pad GO ची सेल 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

OnePlus Pad GO टॅबलेटची प्री-ऑर्डर आज 12 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. हा टॅबलेट कंपनीने ऑक्टोबरच्या सुरुवातीला लाँच केला होता. दरम्यान, या टॅबचे प्री-बुकिंग आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाले आहे. तर, त्याची सेल 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. चला तर मग टॅबची किंमत, उपलब्धता आणि तपशील संबंधित तपशील जाणून घेऊया.

OnePlus Pad GO ची किंमत

कंपनीने OnePlus Pad GO 19,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. ही किंमत टॅबच्या Wi-Fi 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. यात LTE व्हेरिएंट देखील मिलेल, ज्याची किंमत 21,999 रुपये आहे. तर, LTE 256GB मॉडेलची किंमत 23,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI, OneCard, SBI, ICICI, Kotak आणि Axis Bank कार्ड्सद्वारे टॅबवर 2000 रुपयांची सूट मिळेल. एवढेच नाही तर, प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना 1,399 रुपये किमतीचे वनप्लस पॅड गो फोलिओ कव्हरही मोफत मिळेल. नवीन टॅबलेट ग्राहक Flipkart, Amazon आणि OnePlus वेबसाइटवरून खरेदी करू शकतील.

OnePlus Pad GO

टॅबमध्ये 11.35 इंच लांबीचा डिस्प्ले मिळणार आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. हा टॅब MediaTek Helio G99 प्रोसेसर, 8GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS 2.2 स्टोरेजसह सुसज्ज आहे. या टॅबमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅजिक स्टॅबिलायझेशन (EIS) सह 8MP रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा आहे.

यासह, OnePlus Pad GO Tab तब्बल 8000mAh बॅटरीने सुसज्ज आहे, ज्यासोबत 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. ऑडिओसाठी या टॅबमध्ये क्वाड स्पीकर्स देण्यात आले आहेत, ज्यात डॉल्बी ATMOS सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, Wi-Fi, ब्लूटूथ आणि USB चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :