भारीच की! OnePlus Pad GO टॅबलेट भारतात लाँच, 20 हजार रुपयांअंतर्गत Best पर्याय उपलब्ध। Tech News 

भारीच की! OnePlus Pad GO टॅबलेट भारतात लाँच, 20 हजार रुपयांअंतर्गत Best पर्याय उपलब्ध। Tech News 
HIGHLIGHTS

अखेर आज OnePlus Pad GO भारतात लाँच झाला आहे.

Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँडना भारतीय बाजारपेठेत मिळेल कठीण स्पर्धा

12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून अधिकृत वेबसाइट आणि Amazon India वरून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होणार

मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती की, Oneplus किफायशीर किमतीत टॅबलेट लाँच करणार आहे. अखेर आज OnePlus Pad GO भारतात लाँच झाला आहे. या टॅबमुळे, Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँडना भारतीय बाजारपेठेत कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल. यापूर्वी कंपनीने वनप्लस पॅड टॅबलेट भारतीय बाजारात लॉन्च केला होता. चला तर मग बघुयात कंपनीच्या लेटेस्ट टॅबलेटची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

OnePlus Pad Go ची भारतात किंमत

OnePlus Pad Go च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज Wi-Fi व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. त्याबरोबरच, त्याच्या LTE मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. टॅबलेटच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज LTE वेरिएंटची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा टॅब 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून अधिकृत वेबसाइट आणि Amazon India वरून प्री-बुक करता येणार आहे.

oneplus pad go
oneplus pad go

OnePlus Pad Go

OnePlus ने Pad Go टॅबलेटमध्ये 11.35 इंच लांबीचा डिस्प्ले दिला आहे, ज्याचे रिफ्रेश रेट 144Hz आहे. त्याची स्क्रीन डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ ने सुसज्ज आहे. OnePlus Pad Go टॅबलेटमध्ये Helio G99 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह Mali-G57 MP2 GPU आहे. टॅबलेट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजने सुसज्ज आहे. याशिवाय, टॅबलेटमध्ये उत्कृष्ट आवाजासाठी क्वाड स्टीरिओ स्पीकर्स आहेत, जे डॉल्बी ATMOS ला सपोर्ट करतात. त्याबरोबरच, हा टॅब Android 13 आधारित OxygenOS 13.1 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

OnePlus Pad Go च्या मागील बाजूस 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, व्हिडिओ कॉलिंगसाठी टॅबच्या पुढील बाजूस 8MP कॅमेरा देखील उपलब्ध आहे. तुम्हाला काही महत्त्वाचे काम असल्यास आता मध्ये खंड पडण्याची चिंता नसेल, कारण, टॅबलेटमध्ये 8,000mAh बॅटरी आहे, जी 33W जलद चार्जिंगच्या मदतीने पटकन चार्ज केली जाऊ शकते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo