OnePlus भारतीय वापरकर्त्यांसाठी OnePlus Pad Go हा नवीन टॅबलेट लाँच करणार आहे. विशेष म्हणजे याला बजेट रेंजमध्ये एंट्री मिळणार आहे. हे देखील स्पष्ट झाले आहे की, हे उपकरण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वरून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यासोबतच कंपनीने आगामी टॅबच्या लाँच डेटचे अनावरण केले आहे. चला तर मग OnePlus Pad Go ची लॉन्च डेट, अपेक्षित फीचर्स आणि इतर तपशील जाणून घेऊयात.
आगामी टॅबलेटच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास OnePlus Pad Go ला कर्व-एज डिझाइन आणि कॅमेरा लेआउट देण्यात आला आहे. त्याबरोबरच OnePlus Pad Go ग्रीन कलर ऑप्शनमध्ये दिसला आहे. यात मिक्स्ड कलरसह मॅट मेटल आणि ग्लॉसी फिनिश आहे. हा कलर कॉम्बो ‘ट्विन मिंट’ कलरचा असेल, असा कंपनीचा दावा आहे.
OnePlus ने जाहीर केले आहे की, नवीन OnePlus Pad Go भारतात 6 ऑक्टोबर रोजी लाँच केला जाईल. लाँच डेटसोबतच, कंपनीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर मायक्रो साइट देखील सूचीबद्ध केली आहे. म्हणजेच वापरकर्ते फ्लिपकार्ट वरून हा टॅबलेट खरेदी करू शकणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे उपकरण दोन आवृत्त्यांमध्ये येण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये Wi -Fi आणि मोबाईल डेटा ऑप्शनची सुविधा आहे.
OnePlus Pad Go च्या लीक स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus Pad Go मध्ये मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 2.4K रेझोल्यूशन मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, Android 13 वर आधारित OxygenOS 13 वर डिव्हाइस ऑफर केले जाऊ शकते. यासोबत याला Android 14 आणि इतर अपडेट मिळत राहतील, असे देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, यात एक विशेष फिचर मिळू शकते, ते म्हणजे कंटेंट सिंक फिचर होय. या फीचरद्वारे OnePlus उपकरणांमध्ये फाइल शेअरिंग करता येते. वनप्लस स्मार्टफोन युएजर्स Wi-Fi कनेक्शन न वापरताही त्यांची स्क्रीन टॅब्लेटसह शेअर करू शकतील. यामध्ये युजर्स कॉल घेऊ शकतील असे देखील फिचर देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. असेही सांगितले जात आहे की OnePlus Pad Go मध्ये मागील कॅमेरा आणि चार स्पीकर आहेत.