OnePlus Pad 2 भारतात लाँच! एकाच वेळी स्क्रिनवर चालतील 3 वेगवेगळे Apps, पहा किंमत

Updated on 17-Jul-2024
HIGHLIGHTS

लेटेस्ट OnePlus Pad 2 भारतीय बाजारात लाँच झाला आहे.

नवा OnePlus Pad 2 मिड-बजेटमध्ये लाँच करण्यात आला आहे.

OnePlus Pad 2 ची खुली विक्री 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल.

OnePlus ने नुकतेच इटलीमध्ये झालेल्या Oneplus समर लाँच इव्हेंटमध्ये OnePlus Pad चा सक्सेसर म्हणून OnePlus Pad 2 भारतात लाँच केला आहे. कंपनीने या इव्हेंटमध्ये अनेक डिवाइस लाँच केले आहेत. याशिवाय, कंपनीने याच इव्हेंट दरम्यान लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus Nord 4 देखील लाँच केला आहे.

दरम्यान OnePlus Pad 2, OnePlus Pad Pro चे रीब्रँडेड वर्जन असल्याचे सांगितले जात आहे. हे उपकरण या वर्षाच्या सुरुवातीला चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. OnePlus Pad 2 सोबत कंपनीने ॲक्सेसरीजची घोषणा केली आहे. होय, यासह कंपनीने वनप्लस स्टायलो 2 आणि स्मार्ट कीबोर्ड देखील सादर केला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात OnePlus Pad 2 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

OnePlus Pad 2 ची भारतीय किंमत

#ONEPLUS PAD 2

OnePlus Pad 2 भारतात 39,999 रुपये किमतीत सादर केला आहे. हा टॅबलेट सिल्व्हर कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, टॅबलेटची खुली विक्री 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा पॅड ICICI बँक आणि वन कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 2,000 रुपयांची झटपट सूटही मिळणार आहे.

OnePlus Pad 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लेटेस्ट OnePlus Pad 2 मध्ये 12.1-इंच लांबीचा 3K ReadFit LCD डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटचे समर्थन मिळणार आहे. वनप्लस पॅड 2 मध्ये डॉल्बी व्हिजनसाठी देखील समर्थन आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, OnePlus Pad 2 Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आणि 12GB RAM आहे.

यात सहा स्टिरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. मल्टीटास्किंगसाठी, OnePlus ने सांगितले की, कंपनी OnePlus Pad 2 वर ओपन कॅनव्हास आणत आहे. तुम्ही स्क्रीनवर एकाच वेळी 3 ॲप ओपन करून युज करू शकता. त्याबरोबरच, यात वनप्लस स्मार्ट कीबोर्ड देखील आहे. ज्यामध्ये तुम्हाला मोठे टचपॅड आणि शॉर्टकट की देखील आहेत. पॉवरसाठी, या टॅबलेटमध्ये 9510mAh बॅटरी आहे, जी 67W जलद-चार्जिंगला सपोर्ट करेल.

दरम्यान, AI फीचर्सची संपूर्ण नवीन श्रेणी तुम्हाला सुपर प्रोडक्टीव्ह बनण्यास मदत करेल. तुम्हाला रेकॉर्डिंग समरी, AI रायटर आणि OnePlus Nord 4 मध्ये आढळणारी सर्व AI फीचर्स मिळणार आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :