वनप्लसने लाँच केले उत्कृष्ट आवाजाचे आकर्षक इयरफोन्स

वनप्लसने लाँच केले उत्कृष्ट आवाजाचे आकर्षक इयरफोन्स
HIGHLIGHTS

वनप्लसने ह्या इयरफोन्सला आयकन्स असे नाव दिले आहे. आणि ह्याची किंमत २,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

कंपनीने सांगितले आहे की, येत्या सोमवारपासून हे मिळण्यास सुरुवात होईल. जर ह्याची तुलना इतर इयरफोन्सशी केली, ज्यात 9mm ड्रायव्हर आहेत,त्यांच्या तुलनेत ह्यात 11mm ड्रायव्हर्स आहेत आणि ह्याचा बेस आणि ट्रेबलसुद्धा आकर्षक आहे.

 

ह्यात तीन बटन दिले आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण आवाज कमी जास्त करु शकता आणि येणा-या कॉल्सला उत्तरसुद्धा देऊ शकता आणि कंपनीचे असे म्हणणे आहे की, हे सर्व अॅनड्रॉईड फोन्ससह आणि कंपनीच्या स्वत:च्या फोन्समध्येसुद्धा उत्कृष्ट चालतात.

ह्याच्या वैशिष्ट्यांंविषयी बोलायचे झाले तर, ह्यात १.२५ मीटरची तार आणि ११०dB चा साउंड प्रेशरसुद्धा  मिळत आहे. ह्याची फ्रीक्वेंसी रेंज 20-20,000Hz आहे. हा भारतात ग्रेफाइट रंगात अगदी सहजपणे उपलब्ध  होईल. सध्यातरी ह्याच्या सोनेरी रंगातील  प्रकाराची घोषणा केली आहे.

कंपनीने मागील महिन्यात आपला नवीन स्मार्टफोन वनप्लस X भारतात लाँच केला होता. त्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर ५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. ही डिस्प्ले AMOLED आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात एक हायब्रिड ड्यूल सिमसुद्धा आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo