OnePlus Festive Sale: स्मार्टफोनपासून ते स्मार्टवॉचपर्यंत सर्व प्रोडक्ट्सवर ऑफर्सचा वर्षाव,पहा Discount ऑफर्स 

OnePlus Festive Sale: स्मार्टफोनपासून ते स्मार्टवॉचपर्यंत सर्व प्रोडक्ट्सवर ऑफर्सचा वर्षाव,पहा Discount ऑफर्स 
HIGHLIGHTS

OnePlus ने सणासुदीच्या काळात दिवाळी सेलचे आयोजन केले आहे.

OnePlus दिवाळी सेलमध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इअरबड्स स्वस्त दरात मिळतील.

सेलदरम्यान तुम्हाला OnePlus 12 आणि इतर स्मार्टफोन्सवर भारी सवलती उपलब्ध

सणासुदीच्या काळात अनेक कंपन्यांनी दिवाळी आणि दसऱ्याला सेलचे आयोजन केले आहे. यामध्ये आता प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OnePlus चे नाव देखील समाविष्ट झाले आहे. सणासुदिच्या ऑफर्समुळे ग्राहकांना OnePlus प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. OnePlus दिवाळी सेलमध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इअरबड्स स्वस्त दरात खरेदी करता येईल. सेलदरम्यान तुम्हाला OnePlus 12, OnePlus Nord 4, OnePlus Nord CE4, OnePlus Watch 2, OnePlus Pad 2 यांसारख्या प्रोडक्ट्सवर प्रचंड सवलती मिळणार आहेत.

Also Read: itel Flip 1: सर्वात स्वस्त फ्लिप फोन भारतीय बाजारात लाँच! किंमत फक्त 3,000 रुपयांपेक्षा कमी

OnePlus Diwali Sale

स्मार्टफोन्सवरील ऑफर्स

OnePlus 12 स्मार्टफोन 55,999 रुपयांच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. यासह तुम्हाला मोफत OnePlus Buds Pro 3 इयरबड्स मिळणार आहेत. कंपनी या फोनवर 2,000 रुपयांचे स्पेशल कूपन आणि 7,000 रुपयांचे इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळेल.

oneplus diwali sale

तुम्ही 25,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत OnePlus Nord 4 खरेदी करू शकता. याच्या खरेदीवर 2,000 रुपयांची झटपट बँक सूट दिली जात आहे. OnePlus Nord CE4 खरेदी केल्यास Nord Buds 2r मोफत उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर, फोनवर 2,000 रुपयांची सूट आणि 1,500 रुपयांची झटपट बँक सूट मिळेल.

याव्यतिरिक्त, OnePlus Nord CE4 Lite ची किंमत 16,999 रुपयांपासून सुरू होते. यासोबतच, बुलेट वायरलेस Z2 इअरबँड मोफत मिळणार आहेत. याशिवाय 1,000 रुपयांचे विशेष कूपन आणि 2,000 रुपयांची इन्स्टंट बँक सूट दिली जात आहे.

OnePlus Watch 2

OnePlus Watch 2 वर 8,000 रुपयांची सूट दिली जात आहे. ही स्मार्टवॉच दिवाळी सेलमध्ये 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. OnePlus दिवाळी सेलदरम्यान मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

OnePlus Pad 2

OnePlus Pad 2 टॅबलेटवरही प्रचंड सूट मिळणार आहे. हा टॅबलेट खरेदी करून कंपनी यावर 7,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी देत ​​आहे. हा टॅबलेट तुम्ही दिवाळी सेलमध्ये 40,999 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असेल.

OnePlus Bud

OnePlus दिवाळी सेल दरम्यान Nord Buds 3 Pro ची किंमत 2,799 रुपये इतकी आहे. तुम्ही OnePlus Nord Buds 3 2,299 रुपयांना खरेदी करू शकता. त्याबरोबरच, सवलतीनंतर OnePlus Buds Pro 3 ची किंमत 10,999 रुपये इतकी आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo