अॅपच्या माध्यमातून कॅब सेवा देणारी कंपनी ओलाने मोफत ऑटो कनेक्ट वायफाय सेवा सादर केली आहे. ह्या सेवेअंतर्गत आता सर्व प्रवाशांना वाय-फाय सेवा वापरण्यासाठी ह्यावेळी पुन्हा-पुन्हा लॉगइन करण्याची गरज नाही.
ह्यामुळे ग्राहकांनी आपल्या फोनवर प्रमाणित केल्यानंतर आपल्या डिवाइसवर अगदी सहजपणे ओला वायफायचा वापर करु शकतात. ह्यासाठी त्यांना आपल्या प्रत्येक प्रवासादरम्यान पुन्हा पुन्हा लॉगइन क्रेडेन्शियल्स किंवा पासवर्ड देण्याची आवश्यकता नाही.
सध्या ही सेवा ओला प्राइम यूजरसाठी उपलब्ध आहे, मात्र लवकरच मायक्रो, मिनी आणि ऑटो-रिक्शा यूजरसुद्धा ह्या वायफाय सेवेचा अनुभव घेऊ शकतील.
ऑटो कनेक्ट वायफाय इनोवेशनसह ओला ला आशा आहे की , हे सेवा प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान वायफायचा उत्कृष्ट अनुभव देईल.
हेदेखील वाचा – हिरेजडित असलेल्या सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचची किंमत आहे १० लाख रुपये
हेदेखील वाचा – आता लवकरच तुम्ही व्हॉट्सअपवरुन करु शकणार लँडलाइन आणि मोबाईल कॉल