आता डेबिट कार्ड विना पण काढता येईल ATM मधून कॅश
लवकरच आता तुम्ही कोणत्याही डेबिट कार्ड विना एटीएम मशीन मधून सहज पैसे काढू शकाल. जे तुम्ही वाचलंत ते लवकरच सत्यात येणार आहे आणि तुम्ही QR कोड च्या माध्यमातून पण कार्ड विना पैसे काढू शकाल. यासाठी एक अनोखी सिस्टम बनवण्यात आली आहे ज्यामुळे हे शक्य होईल.
जर तुम्ही पण अशा लोकांपैकी असाल जे एटीएम मशीन वर पैसे काढायला जातात परंतु बऱ्याचदा डेबिट कार्ड विसरून जात आणि त्यामुळे तुम्हाला रिकाम्या हाताने परतावे लागत असेल तर आता असे होणार नाही. AGS Transact Technologies ती कंपनी आहे जी सर्व बँकांना ATM सर्विसची सुविधा देते. या कंपनी ने एक अशी सिस्टम बनवली आहे जी UPI प्लॅटफार्मचा वापर करून ATM मशीन्स मधून कॅश काढू शकते।
त्याचबरोबर जर एटीएम मधून कॅश काढल्यानंतर तुमचे डेबिट कार्ड एटीएम मशीन मधेच राहत असेल आणि तुम्ही ते तिथेही विसरत असाल तर हि सिस्टम तुमच्यासाठी खूप उपयोगी उपयोगी आहे. या सिस्टम च्या माध्यमातून यूजर एटीएम मशीन वरून एक QR कोड स्कॅन करून कॅश काढू शकतो. आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारे डेबिट कार्ड स्वाईप करण्याची गरज नसेल. क्यूआर कोड मशीनच्या स्क्रीन वरून स्कॅन करत येईल. हे सर्व काही यूनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजे UPI बेस्ड सिस्टम अंतर्गत होईल. रिपोर्ट नुसार सेकेंड जेनरेशन UPI 2.0 असेलल्या मशीन मधून कॅश काढणे खूप सोप्पे होईल.
पण रिपोर्ट्स नुसार अजूनतरी या सर्विसला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून मंजूरी मिळालेली नाही. AGS नुसार कंपनी ने या टेक्नॉलॉजीची चाचणी आधीच केली आहे. आणि जेव्हा या फीचर बद्दलची माहिती बँकांना देण्यात आली तेव्हा सर्व बँका खूप उत्सुक झाल्या.