आता देशभरात उपलब्ध होणार गुगल प्ले गिफ्ट कार्ड्स

Updated on 05-Oct-2015
HIGHLIGHTS

गुगल आता प्ले स्टोअरमधून अॅप आणि चित्रपट इ. गोष्टी घेण्याचे सोयीस्कर बनविणार आहे. जून महिन्यात ह्यासाठी गुगलने गुगल प्ले गिफ्ट कार्ड्ससुद्धा लाँच केले होते आणि हे सर्व आता देशभरातील रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध होऊ शकतात.

गुगल आता प्ले स्टोअरद्वारे चित्रपट आणि अॅप घेणे सोयीस्कर बनवणार आहे. काही बातम्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे की, गुगलने ह्यासाठी जून महिन्यातच गिफ्ट वाउचर लाँच केले होते. मात्र त्यावेळी हे काही ठराविकच स्टोअर्समध्ये मिळत होते. ह्यामुळे अनेक वापरकर्ते त्याचा लाभ घेऊ शकत नव्हते. मात्र आता गुगलने अशी घोषणा केली आहे की, हे गुगल प्ले गिफ्ट्स कार्ड्स देशभरात सर्व रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध झाले आहेत आणि आपण हे अगदी सहजरित्या घेऊ शकता. गुगलने ह्यावेळी घोषणा केली आहे की, तुम्ही ह्या गिफ्ट्स कार्डंना स्पाईस हॉटस्पॉट, विजय सेल्स, प्लॅनेट एम, प्लॅनेट मोबाईल आणि संगीता मोबाईल्स सारख्या स्टोअर्समधून खरेदी करु शकता.

 

हे कार्ड्स आतापर्यंत केवळ अमेरिकेतच उपलब्ध होते. मात्र आता भारतातसुद्धा गुगल प्ले स्टोअरमधून अॅप्स, चित्रपट, पुस्तके, संगीत, गेम्स इत्यादी गुगल प्ले प्रीपेड वाउचर्सने खरेदी करु शकता. सांगायचेच झाले तर, ह्यासाठी अलीकडेच भारताचे नाव गुगल सपोर्ट पानावर वाउचर्स देणा-या देशांच्या यादीत जोडले आहे. त्यामुळे आता आपणही वाउचर्सच्या साहाय्याने गुगल प्ले स्टोअरने आपल्या पसंतीचे चित्रपट, गेम,पुस्तक, अॅप आणि संगीत इत्यादींना अगदी सहजरित्या आपले बनवूू शकता.  

 

 

 

 

जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो अखेर हे प्रीपेड वाऊचर नक्की काय आहे ते.. तुम्हाला माहितच असेल की आजवर आपण गुगल प्ले स्टोअरवरुन जी कोणती गोष्ट घेतली ती मोफत नाही. त्यासाठी आपल्याला  काही पैसे मोजावे लागतात. हा खर्च आपल्या मोबाईलच्या शिल्लक रकमेमधून घेतला जातो.

 

त्याव्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने ही रक्कम भरु इच्छिता तर तेही तुम्ही करु शकता. त्याचबरोबर आजकाल नेट बँकिंगद्वारे सुद्धा रक्कम भरली जाते. मात्र ह्या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला ह्यातील कोणताही पर्याय निवडण्याची गरज नाही. ह्या वाऊचरच्या माध्यमातून तुम्ही सरळ गुगल प्ले स्टोअरवर कोणताही त्रास सहन न करता खरेदी करु शकता. हे तुमच्यासाठी सुरक्षित पण आहे. तुम्हाला तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठीसुद्धा हा मदत करतो. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला कुठेही इंटरनेटवर वापर करण्याची गरज पडणार नाही. आपण वाउचर्सच्या माध्यमातून गुगल स्टोअरवर खुप काही खरेदी करु शकता. त्याशिवाय हे गुगल गिफ्ट कार्ड दिल्ली, एनसीआर, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरु, कोलकत्ता आणि जयपूर इत्यादी शहरांच्या काही निवडक स्टोअर्सवर मिळतील.  मात्र हे सुरुवातीलाच होईल. त्यानंतर हे सर्व ठिकाणी उपलब्ध होतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. ह्या कार्ड्सची किंमत ५००, १००० आणि १५०० रुपये अशी आहे.

Ashvani Kumar

Ashvani Kumar is Tech, Politics, and Sports lover.

Connect On :